शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात बँका कॅशलेस व्यवहारावर करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन !

By admin | Updated: December 25, 2016 21:40 IST

कॅशलेस व्यवहाराबाबत जिल्हा अग्रणी बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया व इतर बँकर्स शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत.

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 25 - राज्यस्तरीय अ‍ॅग्रोटेक कृषी प्रदर्शनात कॅशलेस व्यवहाराबाबत जिल्हा अग्रणी बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया व इतर बँकर्स शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८ व्या जयंती तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जन्मदिवसाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ ते २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे.अ‍ॅग्रोटेक २०१६ हे कृषी प्रदर्शन उत्तम शेतीची संकल्पना रुजविणारे ठरणार असल्याचा विश्वास कृषी विद्यापीठाला आहे. यासोबतच विद्यापीठाने विकसित केलेले कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान व कृषीपूरक प्रक्रिया उद्योग व व्यवसाय इत्यादींची माहिती येथे शेतकऱ्यांना देण्यात येईल. हे वर्ष जागतिक मृदा वर्ष म्हणून साजरे करण्यात आले या पृष्ठभूमीवर शेतीचा श्वास व प्राण असलेली जमीन व पाणी वापर शेतकऱ्यांनी कसा करावा यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.यंदाच्या कृषी प्रदर्शनामध्ये ४०० स्टॉल लावण्यात आले आहेत.कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विद्यापीठाच्या दालनासोबतच शासनाच्या विविध विभागांचे माहितीयुक्त दालने, कृषी निविष्टा उत्पादक कंपन्यांची दालने, कृषी यंत्रे व अवजारे उत्पादक कंपन्यांची दालने तसेच स्वयं सहाय्यता बचत गटांची दालने, पशू प्रदर्शन इत्यादींची माहिती येथे शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ देतील.- शेतकऱ्यांना देणार कॅशलेस व्यवहाराची माहिती कृषी प्रदर्शनात पात ते सात लाख शेतकरी भेट देणार असल्याने त्यांना कॅशलेस संकल्पना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली जाणार आहे. याकरिता जिल्हा अग्रणी बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया आदी बँकर्स शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. यंदाच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पाच ते सात शेतकरी व नागरिक भेट देणार आहेत. त्या दृष्टीने कृषी विद्यापीठाने नियोजन केले असून, शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहार सोप्या करता यावा यासाठी बँका मार्गदर्शन करणार आहेत. - डॉ. किशोर बिडवे,जनसंपर्क अधिकारी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला