शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बँक फोडून पावणेसात लाखांसह तिजोरी पळविली

By admin | Updated: June 19, 2016 18:08 IST

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा तालुक्यातील मंगरूळ शाखा अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडली़ बँकेची तिजोरी उघडत नसल्याने चोरट्यांनी ६ लाख ७३ हजार ३९८ रूपयांसह तिजोरी पळविली़

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 19 - किल्लारी पिकविमा वाटपापोटी आलेल्या रकमेचा अंदाज घेऊन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा तालुक्यातील मंगरूळ शाखा अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडली़ बँकेची तिजोरी उघडत नसल्याने चोरट्यांनी ६ लाख ७३ हजार ३९८ रूपयांसह तिजोरी पळविली़ या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची औसा तालुक्यातील मंगरूळ येथे शाखा आहे. या शाखेअंतर्गत मंगरूळसह गुबाळ, सारणी, हासलगन, नांदुर्गा या गावांचा समावेश आहे. सध्या जिल्हा बँकेच्या विविध शाखांतून पिकविम्याचे वाटप सुरू आहे. त्यामुळे मंगरूळच्या शाखेस शेतकऱ्यांच्या पिकविमा वाटपासाठी रक्कम आलेली होती. गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना पिकविमा वाटप सुरू आहे. त्यामुळे बँक सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती़ पिकविमा उचलण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची गर्दी पाहून शनिवारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत बँक सुरू ठेऊन शेतकऱ्यांना विम्याचे वाटप सुरू केले होते. विमा वाटप झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी बँक बंद केली आणि घराकडे गेले. दरम्यान, गावात पावसाला सुरुवात झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता.बँकेकडे मोठ्या प्रमाणात रक्कम आली असल्याचा अंदाज अज्ञात चोरट्यांनी घेऊन मध्यरात्री बँकच्या शटरची कुलूपे तोडली़ आतमध्ये प्रवेश करत टेबलसह अन्य ठिकाणी तिजोरीच्या चाव्यांची शोधाशोध केली. त्यानंतर तीन फूट उंचीची तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु ती उघडत नसल्याने चोरट्यांनी तिजोरीच उचलली़ सदरील तिजोरी मोठ्या वाहनात घालून पसार झाले़ रविवारी सकाळी गावातील जिल्हा बँकेची शाखा फोडल्याची चर्चा सुरू झाली़ त्यामुळे पोलिस पाटील ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी या घटनेची माहिती किल्लारी पोलिसांना दिली़ या माहितीवरून किल्लारी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सिद्राम कोळी, सपोनि़ एस़ वाय़घुमारे यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली़ तेव्हा चोरट्यांनी तिजोरीसह रक्कम पळविल्याचे निदर्शनास आले़ दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल महाबोले यांनी भेट देऊन पाहणी केली़ लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनीही बँकेची पाहणी केली़ याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल महाबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डी़बी़ वाघमोडे करीत आहेत. श्वान पथक घुटमळलेचोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. हे पथक रविवारी दुपारी १२ वाजता पोहोचले़ परंतू, शटरच्या भोवतालीच श्वान पथक फिरल्याने माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही़.तिजोरीतील रक्कमबँकेच्या तिजोरीत हजार रुपयांच्या १६१, ५०० रुपयांच्या १००२, १०० रुपयांच्या १०४, ५० रुपयांच्या १० आणि १० रुपयांच्या ५ नोटा असल्याचे बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले.