शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या रकमेला बँकांची कात्री

By admin | Updated: August 10, 2015 22:57 IST

नवीन कर्जाची रक्कम विम्यातून कपात; शेतकरी थेट लाभापासून वंचित.

संतोष येलकर/अकोला: दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात आले; मात्र पुनर्गठन करून, यावर्षी नवीन पीक कर्ज देण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जात पीक विम्याची रक्कम बँकांकडून जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असले तरी, कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी, पीक विम्याच्या रकमेला बँकांनी कात्री लावली आहे. विमा रकमेतून कर्जाची कपात करण्यात येत असल्याने, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांवर पीक विम्याच्या थेट लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिके हातून गेली. नापिकीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर गतवर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्‍यांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जांचे पुनर्गठन करून, त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करण्याचे काम बँकांमार्फत करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकर्‍यांठी पीक विम्याची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली. ही पीक विम्याची रक्कम गत जुलैअखेरपर्यंत राष्ट्रीय कृषी विमा कंपनीमार्फत राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात वितरित करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ इत्यादी पाचही जिल्हय़ातील शेतकर्‍यांसाठी पीक विम्यापोटी ४२१ कोटी ९ लाखांची रक्कम प्राप्त झाली. प्राप्त झालेली पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बँकांना वितरित करण्यात आली; परंतु पीक कर्जाचे पुनर्गठन करून, नवीन पीक देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची पीक विम्याची रक्कम बँकांकडून कर्जाच्या रकमेत जमा केली जात आहे. पीक विम्याची रक्कम यावर्षीच्या पीक कर्जापोटी बँकांकडून कपात केली जात असल्याने, नापिकीच्या परिस्थितीत पीक विमा रकमेच्या थेट लाभापासून वंचित राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. जिल्हा अग्रणी बँक चे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी पीक कर्जाचे पुनर्गठन करून, ज्या शेतकर्‍यांना यावर्षी नवीन कर्ज देण्यात आले,अशा शेतकर्‍यांच्या पीक विम्याची रक्कम पुनर्गठित कर्जाच्या रकमेत जमा करण्याच्या रिझर्व बँकेच्या सूचना असल्याचे सांगीतले. त्यानुसार पीक कर्जाचे पुनर्गठन करून, नवीन कर्ज देण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या पीक विम्याची रक्कम पुनर्गठित कर्जामध्ये जमा केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.