शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

तोतया बँक अधिकाऱ्याने २९ हजारांना लुटले!

By admin | Updated: January 11, 2015 01:45 IST

स्टेट बँकेच्या तोतया शाखाधिकाऱ्याने येथील एका तरुणाकडून फोनवर एटीएम कार्डच्या पिनसह इतर माहिती घेऊन त्याला २९ हजार रुपयांना लुटले. पोलिसांनी मात्र तक्रार घेण्यास नकार दिला.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : स्टेट बँकेच्या तोतया शाखाधिकाऱ्याने येथील एका तरुणाकडून फोनवर एटीएम कार्डच्या पिनसह इतर माहिती घेऊन त्याला २९ हजार रुपयांना लुटले. पोलिसांनी मात्र तक्रार घेण्यास नकार दिला. नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे मला तुमच्या बँक खात्याचे व्हेरीफिकेशन करायचे आहे़ व्हेरीफिकेशन केले नाही तर खात्यावरील सर्व पैसे बुडतील, असे मोबाइलवर सांगत या ठकसेनाने तिसगाव येथील कापड दुकानात कामगार आदिनाथ दत्तात्रय गोंधणे याला फसविले. आदिनाथचे कासारपिंपळगाव येथे स्टेट बँकेत बचत खाते आहे. शुक्रवारी रात्री त्याला मोबाइलवर फोन आला़ मी स्टेट बँकेचा शाखाधिकारी असून, तुमचा खाते क्रमांक द्या, असे त्याने सांगितले. त्यावर उद्या खाते क्रमांक सांगतो, असे आदिनाथने सांगितले. मात्र खात्यावरील पैसे बुडतील असे तोतया अधिकाऱ्याने सांगताच आदिनाथने खात्याची माहिती दिली. त्यानंतर तुमच्या एटीएमची पिन बदलली, असे त्या भामट्याने सांगितले. मात्र आदिनाथ शनिवारी एटीएम केंद्रावर गेला असता त्याला खात्यावर २९ हजार रुपये कमी असल्याचे समजले़ त्याने बँकेत चौकशी केल्यानंतर त्यास फसविले गेल्याचे स्पष्ट झाले. आदिनाथने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला़ मात्र, पोलीस निरीक्षक बी.डी. पारेकर यांनी तक्रार घेण्यास नकार देत आदिनाथला बँकेत तक्रार करण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)