शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचारी १५ सप्टेंबरला संसदेवर धडकणार! सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:10 IST

मुंबई : सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने १५ सप्टेंबरला संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. रामलीला मैदान ते संसद भवन असा सुमारे एक लाख बँक कर्मचारी व अधिकाºयांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा दावाही फोरमने केला आहे.रामलीला मैदानावरून सकाळी १० वाजता सुरू होणाºया ...

मुंबई : सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने १५ सप्टेंबरला संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. रामलीला मैदान ते संसद भवन असा सुमारे एक लाख बँक कर्मचारी व अधिकाºयांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा दावाही फोरमने केला आहे.रामलीला मैदानावरून सकाळी १० वाजता सुरू होणाºया मोर्चाचे संसद भवन मार्गावर आल्यावर भव्य सभेत रूपांतर होईल. जगभरात बँक खासगीकरणाचा प्रयत्न अपयशी ठरलेला असून बँकांची विलीनीकरणे रद्द केली जात आहेत. देशात मात्र याउलट परिस्थिती दिसत आहे. सामान्यांच्या घामाच्या पैशाची बचत केलेले १०० लाख कोटी रुपये आज सर्व सरकारी बँकांत सुरक्षित आहेत. मात्र बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्व बचतीची सूत्रे आजवर ७ लाख कोटी रुपयांची कर्जे थकवून त्या बचतीचा अपहार केलेल्या भांडवलदारांच्या हाती जाण्याची भीती फोरमने व्यक्त केली आहे.आॅक्टोबर अखेरीस दोन दिवसांचा संप-बचत ठेवींवरील व्याजदरात केलेल्या कपातीचा व वाढवलेल्या सेवाशुल्काच्या दराचा फोरममधील सर्व संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. कंपन्यांच्या कर्जबुडवेगिरीमुळे झालेले नुकसान सर्वसामान्य जनतेच्या पैशातून वसूल करण्याचा शासनाचा प्रयत्न चुकीचा आहे. तरी सर्व संघटना आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस दोन दिवसांचा संप करण्याचेदेखील ठरवीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.बँक कर्मचा-यांच्या मागण्या काय?थकीत कर्जबुडव्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी.सरकारने कर्जबुडव्यांची यादी जाहीर करावी.भारतीय दंड संहितेत बदल करून कर्ज बुडवणे हा गुन्हा ठरवावा.निवडणूक कायद्यात योग्य बदल करून कर्जबुडव्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे.कर्जबुडव्या कंपन्यांचे उत्तरदायित्व निश्चित करणारी नियमावली करावी.