शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज बँक बंद!

By admin | Updated: November 14, 2016 04:55 IST

गुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र, ८ नोव्हेंबरपासून चलनातून पाचशेच्या नोटा बंद केल्याने, सोमवारीही मोठ्या संख्येने

मुंबई : गुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र, ८ नोव्हेंबरपासून चलनातून पाचशेच्या नोटा बंद केल्याने, सोमवारीही मोठ्या संख्येने ग्राहक बँकेबाहेर उभे राहून गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी आणि रविवारी सुट्टी असतानाही बँक सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. या वेळी सोमवारची सार्वजनिक सुट्टी मात्र कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळे बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना आराम मिळण्यासाठी सोमवारची सुट्टी रद्द झालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर गुरुनानक जयंतीची सुट्टी रद्द केल्याने सोमवारी बँका सुरू राहतील, असे खोटे मेसेज व्हायरल झाले आहेत. परिणामी, मोठ्या संख्येने बँकेतून पैसे काढण्यासाठी, भरण्यासाठी आणि नोटा बदलण्यासाठी लोकांकडून गर्दी होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर, बुधवारी बँक बंद ठेवली होती. मात्र, चलनात नव्या २ हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून नियोजित वेळेच्या एक तास आधी बँक उघडण्याचे आदेश दिले होते. बँक कर्मचाऱ्यांनीही नियोजित वेळेआधी बँक उघडून ठरलेल्या वेळेनंतर बँक बंद केली होती. त्यानंतरही लोकांची गैरसोय होत असल्याने, सुट्टी रद्द करून बँक कर्मचाऱ्यांना काम करण्याचे आदेश सरकारने दिले होते. सर्व एटीएम सुरू होण्याचा दावाही सरकारने केला होता. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एटीएम सेवा सुरू होण्यास काही अवधी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सोमवारी बँक बंद ठेवल्यानंतर, काही प्रमाणात सुरू असलेली एटीएम सेवाही कोलमडेल. (प्रतिनिधी)