शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरात बँकेच्या रोखपालाचा कक्षातच मृत्यू

By admin | Updated: November 18, 2016 16:34 IST

कामाचा ताण असह्य झाल्यामुळे एका बँक अधिका-याचा त्यांच्या कक्षातच मृत्यू झाला. रामपंतलू व्यंकटेश राजू (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 18 -  कामाचा ताण असह्य झाल्यामुळे एका बँक अधिका-याचा त्यांच्या कक्षातच मृत्यू झाला. रामपंतलू व्यंकटेश राजू  (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत रामपंतलू कस्टमर असिस्टंट या पदावर कार्यरत होते. नोटाबंदीमुळे  बँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून बँकेत ग्राहकांची झुंबड उडाल्यामुळे  अधिकारी अन् कर्मचा-यांची अक्षरश: त्रेधातिरपट उडत आहे. दैनंदिन व्यवहार सांभाळतांनाच संतप्त ग्राहकांची समजूत घालण्यातही बँकेचे अधिकारी, कर्मचारी गुंतले आहे. सकाळपासून रात्रीउशिरापर्यंत सुरू असलेले काम आणि प्रचंड दडपण यामुळे अनेक बँक अधिकारी, कर्मचा-यांची अवस्था चांगली नाही. अशाही स्थितीत ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. 
रामपंतलू अशाच प्रकारे आज सकाळी गांधीनगर शाखेत कर्तव्यावर आले आणि रोखपालाचे कर्तव्य बजावू लागले. सकाळी ११ पासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. मात्र, पाण्याचा घोट घेत त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. ११.३० च्या सुमारास रोकड मोजत असताना अचानक रोखपालाच्या कक्षात बसून असलेल्या खुर्चीवरच ते कोलमडले. त्यांनी डोळे वर केले आणि तोंडातून फेस आल्यामुळे समोरच्या ग्राहकांनी बाजुला असलेल्या बँकेच्या दुस-या अधिकारी, कर्मचा-याच्या लक्षात ही बाब आणून दिली. रामपंतलू यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात आल्यामुळे बँकेत एकच खळबळ उडाली. आरडाओरड, गोंगाट वाढला. बँक अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांना लगेच शंकरनगर चौकातील एका खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही.  त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची वार्ता गांधीनगर शाखेसह उपराजधानीतील सर्वच बँकांमध्ये वायुवेगाने पोहचली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. माहिती कळताच बँकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच अंबाझरी पोलीस इस्पितळात दाखल झाले. गांधीनगर शाखेतही मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.