शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाती, रोख रकमेवर ‘वॉच’

By admin | Updated: February 16, 2017 21:12 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेत विविध पथक अधिक सजग झाले आहे.

बँक खाती, रोख रकमेवर ‘वॉच’अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेत विविध पथक अधिक सजग झाले आहे. २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या प्रत्यक्ष मतदानाआधी १९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार संपुष्टात येईल त्यानंतर १९ आणि २० ची रात्र ‘वैऱ्याची’ राहील. या पार्श्वभूमिवर उमेदवारांच्या बँक खाती व रोख रकमेच्या व्यवहारावर अधिक सुक्ष्मपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्त हेमंत पवार यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ६२८ उमेदवारांमध्ये अनेक उमेदवार ‘धनदांडग्या’च्या श्रेणीत मोडतात, तर मतदानाआधी विशिष्ट वस्त्यांमध्ये रोख रक्कम वाटली जात असल्याचा इतिहास आहे. या अनुषंगाने निवडणूक आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संवेदनशील भागांसाठी विशेष पोलीस व्यवस्था करण्यासोबतच रोख रकमेच्या खर्चावर आणि बँकांमधील संशयित व्यवहारावर नजर ठेवली जात आहे. तीन लाखांपेक्षा अधिक रोकड कुणाकडे आढळल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी भरारी पथकाबरोबरच स्थानिक पोलिसांची मदत घेण्याचे आदेश पालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिले आहेत. मतदारांना प्रभावित करण्यासाठी कितीही रकमेचे वाटप केले, तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. आचारसंहिता काळात प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत किती गुन्हे दाखल केलेत, आरटीओ विभागाने किती वाहनांवर कारवाई केली, याचा अहवाल दररोज आयुक्तांना सादर होत आहे. बँकेमध्ये होणाऱ्या संशयित व्यवहारावर नजर ठेवण्याच्या सूचना लिड बँकेचे सुनील रामटेके यांना देण्यात आले असून अशा प्रकारे उघड झाल्यास त्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभाग किंवा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवावे, अशा सूचना संनियंत्रण समितीचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)