शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

अनुदानित सिलिंडरसाठी बँक खाते क्रमांक आवश्यक

By admin | Updated: January 1, 2015 01:27 IST

अनुदानित सिलिंडरसाठी आधार कार्डची सक्ती नसली तरी बँकखाते क्रमांक ग्राहकांना गॅस वितरकांना द्यावा लागणार आहे.

जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत : प्रसिद्धीची जबाबदारी गॅस कंपन्यांवरनागपूर : अनुदानित सिलिंडरसाठी आधार कार्डची सक्ती नसली तरी बँकखाते क्रमांक ग्राहकांना गॅस वितरकांना द्यावा लागणार आहे.केंद्र सरकारने जुन्या योजनेत सुधारणा करून मॉडिफाईड बेनिफिट फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना अनुदानित दरात गॅस सिलिंडर मिळणार आहे. याआधी यासाठी बँक खाते क्रमांकासह आधार क्रमांक देणे बंधनकारक होते. मात्र अनेक ग्राहकांकडे कार्ड नसल्याने या योजनेला विरोध झाला होता. त्यामुळे १७ जून २०१४ ला या योजनेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर केंद्रात आलेल्या नवीन सरकारने जुन्या योजनेत थोडा बदल केला. त्यानुसार ग्राहकांना संबंधित एजन्सीकडे आपला बँक खाते क्रमांक द्यावा लागणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले की, आधार कार्ड नसेल तर तीन महिने त्यासाठी वेळ दिला जाईल. या योजनेला व्यापक प्रसिद्धी देण्याची जबाबदारी ही गॅस कंपन्यांची असून याबाबत त्यांना सूचना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)५६८ रुपये अ‍ॅडव्हांसमध्ये मिळणारएचपी गॅसचे विभागीय व्यवस्थापक अमिताब धर यांनी सांगितले की, लिंक केलेल्या खातेधारक ग्राहकाला त्याच्या खात्यात अ‍ॅडव्हान्स स्वरूपात ५६८ रुपये जमा होणार आहे. ग्राहक जेव्हा जेव्हा सिलिंडरची नोंदणी करेल, तेव्हा त्याच्या खात्यात सबसिडीचे रुपये ट्रान्सफर होईल. समजा ग्राहकाचा मृत्यू झाल्यास...ग्राहकांचा मृत्यू झाल्यास गॅस कनेक्शन मृताचा मुलगा अथवा पत्नीच्या नावाने ट्रान्सफर करता येते. यासाठी आवेदनकर्त्याला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि ग्राहकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र फॉर्मसोबत गॅस एजन्सीमध्ये जमा करावे लागेल.असे करावे लिंक सर्वसामान्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी लोकमतने लिंक करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रकाश टाकला आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याआधारे तुम्ही लिंक करू शकता. त्यासाठी फॉर्म क्रमांक-१ भरावा लागेल. तो फॉर्म बँकेत अथवा गॅस एजन्सीमध्ये जमा करावा लागतो. आधारला एलपीजी ग्राहक संख्येशी लिंक करण्यासाठी फॉर्म क्रमांक-२ भरून गॅस एजन्सीकडे जमा करावा लागेल. या फॉर्मची प्रक्रिया आॅनलाईनद्वारे पूर्ण करता येते. हेल्पलाईनद्वारे लिंक करता येतो. ५७३३३ आणि ५२७२५ वर एसएमएसच्या माध्यमातून लिंक करता येईल. आधार कार्ड नसेल तर ..फॉर्म नं. ३ मध्ये १७ अंकीय ग्राहक संख्या भरून आपल्या बँकेत जमा करू शकता. फॉर्म नं. ४ मध्ये बँक खात्याची माहिती भरून गॅस एजन्सीमध्ये जमा करता येते. फॉर्म नं. ४ च्या प्रक्रियेला आॅनलाईन पूर्ण करता येते. (सर्व फॉर्म गॅस एजन्सीचे कार्यालय अथवा सरकारी बेवसाईटवरून आॅनलाईन डाऊनलोड करता येतात.)