पुसला (वरूड) (अमरावती): जिल्हा परिषदेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या एका इच्छुकाचे तिकीट कापले गेल्याने, इंद्रभूषण चोंडे या नाराज उमेदवाराने बंडखोरीचा नवा मार्ग शोधून काढलाय. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याकरिता त्याने चक्क ‘पाडापाडी कार्यलय’ उघडले आहे.वरूड तालुक्यातील पुसला जि.प.सर्कल हा एससी प्रवर्गासाठी व पंचायत समिती सर्कल सर्वसाधारण गटाकरिता राखीव आहे. इच्छुकांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे तिकिटासाठी बरीच लॉबिंग केली. परंतु अनेकांची निराशा झाली. मग त्यातील काहींनी पक्षबदलाचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली, परंतु तिकीट नाकारल्याने दुखावल्या गेलेल्या पुसल्यातील या उमेदवाराने चक्क ‘पाडापाडी कार्यालय’ असा फलक लावण्यात आला आहे.
बंडोबाने उघडले ‘पाडापाडी’ कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 01:35 IST