शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांची टोळी जेरबंद

By admin | Updated: March 28, 2017 04:13 IST

महापालिका आणि नगरसेवकांच्या परवानगीने आरोग्य कॅम्प लावल्याचे सांगून सर्वसामान्य नागरिकांना कथित

औरंगाबाद : महापालिका आणि नगरसेवकांच्या परवानगीने आरोग्य कॅम्प लावल्याचे सांगून सर्वसामान्य नागरिकांना कथित आयुर्वेदिक औषधे देऊन फसवणूक करणाऱ्या तब्बल २० बोगस डॉक्टरांच्या टोळीला सोमवारी सकाळी एमआयडीसी चिकलठाणा परिसरात जेरबंद करण्यात आले. चिकलठाणा भागात याच टोळीतील आणखी काही जणांनी हा गोरखधंदा सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.नगरसेवक राजू शिंदे यांच्या चिकलठाणा एमआयडीसी वॉर्डात सोमवारी सकाळी किमान २० डॉक्टरांचे पथक दाखल झाले. त्यांनी शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाजूलाच आपले ‘दुकान’ लावले. पथकातील महिला सदस्य अ‍ॅप्रन घालून वॉर्डातील प्रत्येक घरात जात होत्या. मनपाने कॅम्प लावला असून, ५ ते ८० वयोगटातील रुग्णांना व्हिटॅमिन ^‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’युक्त औषधे देण्यात येत आहेत. नोंदणी फी ५० रुपये आणि  औषध घेतल्यावर आणखी ५० रुपये घेण्यात येत होते.वृद्धांना सांधेदुखी, महिलांना केस गळणे, चिडचिडेपणा विशिष्ट औषधांनी दूर होतो आदी अनेक दावे या पथकातील महिलांकडून करण्यात आले. पण देताना घरातील प्रत्येक सदस्याला एकसारख्याच गोळ्या व औषधे देण्यात येत होती. नोंदणी फीमध्ये सूट मिळावी म्हणून एका महिलेने नगरसेवक राजू शिंदे यांना फोन केला. तेव्हा, आपल्या वॉर्डात मनपाने आरोग्य शिबिर लावले का? अशी विचारणा त्यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याकडे केली. त्यांनी नकार देताच शिंदे वॉर्डात पोहोचले.बोगस डॉक्टरांच्या सदस्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रथम मनपाकडून हा कॅम्प असल्याचे सांगितले. नगरसेवकाचीही परवानगी घेतल्याचे नमूद केले. मी कोण आहे, अशी विचारणा केल्यावर आम्हाला काय माहीत, अशी उत्तरे त्या महिलांनी दिली. तुमचे शिक्षण काय, असे शिंदे यांनी विचारले असता सर्वांनी, ‘बारावी उत्तीर्ण’ असे सांगितले.सामाजिक संस्थेचा उपक्रम?दीपक निकाळजे या स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाने आमची सामाजिक संस्था काम करीत असून, त्याअंतर्गत हा उपक्रम सुरू असल्याचे बोगस डॉक्टरांनी सांगितले. रविवारी आंबेडकरनगर येथे आम्ही काम केल्याचे त्यांनी नमूद केले. चिकलठाणा भागातही आमच्या संस्थेचे काही सदस्य काम करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)...आणि त्यांनी ठोकली धूमआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी व इतर डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस येण्यापूर्वीच पथकातील आठ ते दहा महिलांनी अ‍ॅप्रन तिथेच टाकून धूम ठोकली. पाच ते सहा महिला पोलिसांच्या हाती लागल्या.