शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचे केळी एक्सलन्स सेंटर रद्द

By admin | Updated: May 17, 2016 02:54 IST

केळी एक्सलन्स सेंटर कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना अंधारात ठेवून राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने परस्पर रद्द केले

राहुल कलाल,  

पुणे-इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरून केळी पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी जळगावमध्ये प्रस्तावित करण्यात आलेले केळी एक्सलन्स सेंटर कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना अंधारात ठेवून राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने परस्पर रद्द केले आहे. विशेष म्हणजे, या केंद्राची घोषणा खडसे यांनी केली होती. त्यामुळे जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी सुमारे ५२ एकर जमीनही दिली होती. आता या केळी एक्सलन्स केंद्राच्या जागी भाजीपाला एक्सलन्स केंद्र उभारण्याचा नवा प्रस्ताव मंडळाने तयार केला आहे.कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कुशल वापर करून उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या इस्त्राईल सरकारला बरोबर घेऊन महाराष्ट्रातील कृषीचे उत्पादन वाढविण्यासाठी इंडो-इस्त्राईल तंत्रज्ञान ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने हाती घेतली आहे. यासाठी इस्त्राईल आणि भारत यांच्यात करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत रत्नागिरीमध्ये आंबा एक्सलन्स सेंटर आणि नागपूरमध्ये संत्रा एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथे या योजनेअंतर्गत केळीसाठी एक्सलन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने तयार केला होता. जळगाव जिल्हा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा असल्याने त्यांना या सेंटरची माहिती देण्यात आली होती. केळीत संशोधनासाठी जळगावमध्ये एक्सलन्स सेंटर उभारण्याची घोषणाही खडसे यांनी केली होती. या सेंटरचे काम त्वरित सुरू व्हावे, यासाठी खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या सेंटरसाठी सुमारे ५२ एकर जागा देण्यासही सांगितले होते. मंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ही जागा राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाला केळी एक्सलन्स सेंटर उभारणीसाठी दिली होती. एवढे सोपस्कार पार पाडल्यानंतर राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने अचानक केळीसाठीचे हे एक्सलन्स सेंटर न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात केळी उत्पादनासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते ते जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानापैकी एक असल्यामुळे यात नवे तंत्रज्ञान नाही, असे इस्त्राईलने राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाला सांगितले आहे. त्यामुळे मंडळाने केळी एक्सलन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव रद्द करून तेथे भाजीपाला एक्सलन्स सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने केलेला हा खटाटोप खडसे यांना माहितीच नसल्याचे उघडझाले आहे.