शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बंदी उठल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल होणार

By admin | Updated: January 21, 2015 23:58 IST

आंबा बागायतदार सुखावले : यंदा १५ ते २0 मेट्रिक टन निर्यातीची अपेक्षा

रत्नागिरी : युरोपीय देशांनी आंबा आयात करण्यावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी कोकणातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा केली जात आहे. आतापर्यंत २00८-0९ यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ८४ मेट्रिक टन आंबा युरोपीय देशात निर्यात झाला होता. यावर्षी तो किमान १५ ते २0 मेट्रिक टन निर्यात होण्याची अपेक्षा असून, त्यातून लाखोंची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.भारतातून पाठविल्या गेलेल्या आंब्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव असल्याचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी भारतातून आंबा आणण्यावर बंदी घातली होती. फळबागांवरील कीड व रोग प्रतिबंधाचे प्रभावी उपाय योजण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळेच येत्या हंगामातील आंबा युरोपीय देशांनी आयातीवरील बंदी उठविली आहे. युरोप, अमेरिका व जपान येथे निर्यात सुरू झाल्यापासून आंबा उत्पादकांच्या उत्पन्नात भर पडली आहे. युरोपीय देशांच्या हवामानानुसार गॅप प्रमाणपत्र निश्चित करण्यात आले आहे. निर्यातीसाठी त्याची आवश्यकता आहे. अमेरिकेला आंबा पाठवीत असताना गॅमा (विकिरण) प्रक्रिया आवश्यक आहे. सध्या लासलगाव (नाशिक) येथे ही सुविधा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिकच्या अंतरामुळे वाहतूक खर्च परवडत नसल्याने वाशी (नवी मुंबई) येथे हे केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.अरब राष्ट्र तसेच सिंगापूर, मलेशिया येथे आंबा निर्यातीसाठी त्रास होत नाही; मात्र अमेरिका, जपान व युरोपीय देशांमध्ये आंबा पाठविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गतवर्षी युरोपीय देशांनी आंबा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला होता. त्यामुळे आंब्याचे दरही कोसळले होते.भारतातून सन २०११-१२ मध्ये एकूण ६६,४४१ मेट्रिक टन आंबा परदेशात निर्यात करण्यात आला होता. त्यापैकी २५३२ मेट्रिक टन युरोपीय देशात पाठविण्यात आला होता. तसेच २०१२-१३ मध्ये एकूण ५५,४१३ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. त्यापैकी ३,८९० मेट्रिक आंबा युरोपीय देशात पाठविण्यात आला होता. २०१३-१४ मध्ये आयात बंदीमुळे युरोपीय देशात आंबा गेलाच नाही. (प्रतिनिधी)रत्नागिरीतून निर्यात झालेला आंबा२००५-०६ मध्ये ९.५ मेट्रिक टन, २००६-०७ परदेशी पाठविण्यात आलेला नाही, २००७-०८ मध्ये ४०.८२, २००८-०९ मध्ये- ८४.५२, २०१०-११ - ११.०९ , २०११-१२ ला १६.८, २०१२-१३ ला १८ मेट्रिक टन आंबा परदेशी पाठविण्यात आला होता. यंदा सद्य:स्थितीत मोहराचे प्रमाण चांगले असल्याने आणि आयात बंदी उठल्यामुळे यंदा १५ ते २0 मेट्रिक टन इतकी आंबा निर्यात अपेक्षित धरली जात आहे.