शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश मांस बंदी, डान्स बारबाबत अंमलबजावणी

By admin | Updated: May 12, 2016 03:32 IST

गोवंश मांस बंदीबाबत आणि डान्सबार सुरु करण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. त्याबाबत अद्याप न्यायालयाकडून पूर्ण सूचना आलेल्या नाहीत.

मुंबई: गोवंश मांस बंदीबाबत आणि डान्सबार सुरु करण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. त्याबाबत अद्याप न्यायालयाकडून पूर्ण सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे डान्सबारवर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी सांगितले. मुंबईत पोलिसांच्या आठ तास ड्युटीबाबत प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु आहे. त्याला यश मिळाल्यास तो पॅटर्न सर्वत्र लागू करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना आयुक्त पडसलगीकर यांनी विविध विषयांवर मते मांडली. गोवंश मांस बंदीबाबत उच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विचारले असता. ते म्हणाले की, बीफ बाळगण्यावर आता कारवाई होणार नाही. त्याबाबत कोर्टाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार किंवा त्याची अंमलबजावणी केली जाईल. डान्सबार बाबत न्यायालयात अद्याप सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी त्याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या अंतिम आदेशानंतर त्यानुसार डान्सबारला परवानगी बाबतच्या सूचना दिल्या जातील. मुंबई पोलिसातील भ्रष्टाचारी अधिकारी, कमचाऱ्यांवर ‘एसीबी’ कडून कारवाईचे प्रमाण वाढल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, गैरवर्तन, अधिकारांचा गैरवापर न करण्याबाबत आपण पहिल्या दिवसापासून सूचना करत आहोत. ज्यांच्यावर ‘ट्रॅप’ ठेवलाय त्यांच्यावर आमच्याकडून तातडीने कारवाई केली जात आहे.पोलिसांना आठ तासाची ड्युटी लागू करण्याच्या अनुषंगाने देवनार पोलीस ठाण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी तीन शिफ्टमध्ये ड्युुटीचे नियोजन केले असून त्याला प्रतिसाद कसा मिळतो, त्याबाबत नेमलेल्या मुलांच्या समितीचा अहवाल यांचा विचार करुन ही संकल्पना सर्वत्र राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकाला सूचना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय खैरे यांच्या कार्यपद्धतीबाबत पोलीस ठाण्यातील अन्य सर्व अधिकाऱ्यांनी तक्रारकरत अन्यत्र बदली मागितली आहे. यासंदर्भातले वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. याबाबत विचारणा केली असता, आयुक्त म्हणाले, की वरिष्ठ निरीक्षकांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अन्य काही बाबतीतील आवश्यकतेनुसार बदल करण्यात आला आहे. खैरे यांच्याबाबत पुन्हा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल.