शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डान्सबार बंदीचे विधेयक जूनमध्ये

By admin | Updated: May 8, 2014 14:18 IST

राज्यातील डान्सबार बंदीसाठीचे सर्वंकष विधेयक २ जूनपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनात मांडणार : अतिरिक्त अर्थसंकल्प ५ जूनला

मुंबई : राज्यातील डान्सबार बंदीसाठीचे सर्वंकष विधेयक २ जूनपासून सुरू होणार्‍या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी ही माहिती पत्रकारांना दिली. राज्य शासनाने डान्सबार बंदीचा ऐतिहासिक कायदा केला होता. त्याची सर्वत्र प्रशंसादेखील झाली होती. तथापि तो न्यायालयात टिकू शकला नाही. मात्र डान्सबारसाठीच्या परवान्यांचे नूतनीकरण राज्य शासनाने न केल्याने डान्सबार सुरू होऊ शकले नाहीत. डान्सबारमालकांनी त्याविरुद्ध दाद मागितली असता परवान्यांचे नूतनीकरण का केले नाही, याबाबत १५ दिवसांच्या आत बाजू मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात डान्सबार बंदीचे सर्वंकष विधेयक आणले जाणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले की, आधीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून दुरुस्ती विधेयक आणायचे की नवेच विधेयक आणायचे, याबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात घेण्यात येईल. पावसाळी अधिवेशनात ५ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे मागील अधिवेशनात केवळ अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. बुधवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, कार्यक्रम पत्रिकेला मान्यता देण्यात आली.

१३ विधेयके मांडण्यात येणार या अधिवेशनात प्रलंबित असणारी ७ जुनी विधेयके आणि ६ नवीन, अशी १३ विधेयके मांडण्यात येणार आहेत. ७ जुन्या विधेयकांपैकी ३ विधेयके संबंधित विभागांनी मागे घेतली होती. नव्या सुधारणांसह सदर ३ विधेयके पुनर्स्थापित करण्यात येतील. या जोडीलाच राज्यातील दुष्काळ, गारपीट, कायदा-सुव्यवस्था, दलित अत्याचार आदी प्रश्नांवरही चर्चा केली जाईल. अशासकीय कामांसाठी एक दिवस राखून ठेवण्यात आला आहे.