शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी-प्राण्यांच्या विक्रीवर बंदी घाला

By admin | Updated: August 6, 2016 05:22 IST

क्रॉफर्ड मार्केटमध्ये चालणाऱ्या पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी

मुंबई : क्रॉफर्ड मार्केटमध्ये चालणाऱ्या पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस व संबंधित प्रशासनाला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत या नोटीसवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने संबंधित प्रतिवाद्यांना दिले आहेत.क्रॉफर्ड मार्केटमध्ये विक्रीसाठी असलेल्या प्राण्यांना व पक्ष्यांना अयोग्य पद्धीतीने ठेवण्यात येते. एका छोट्या पिंजऱ्यात अनेक प्राण्यांना व पक्ष्यांना कोंबण्यात येते. त्यामुळे अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाला अशाप्रकारे पाळीव प्राण्यांची व पक्ष्यांची विक्री करणाऱ्या दुकांनाना नियमित करण्यासाठी नियम तयार करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.‘डोळे न उघडलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांनाही त्यांच्या आईपासून दूर केले जाते. रडू नयेत म्हणून त्यांना औषधेही दिली जातात. तर मांजरीच्या पिल्लांची नखे लागू नयेत म्हणून ती मुळांसकट काढली जातात. तसेच पक्ष्यांच्या टोकदार चोची गरम सुरीने कापल्या जातात,’ असे याचिकेत म्हटले आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १९९३ पासून क्रॉफर्ड मार्केटमधून आठ हजार प्राणी, पक्ष्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून सोडवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, घटनेच्या अनुच्छेद २१ नुसार जीवन जगण्याचा अधिकार केवळ माणसांपुरताच मर्यादित नसून सर्व सजीवांनाही लागू होतो. प्रीव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्टनुसार, जो कोणी प्राण्यांचा, पक्ष्यांचा सांभाळ करतो, त्याने प्राण्याची किंवा पक्ष्याची योग्य ती काळजी घेणे बंधनकारक आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)