शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हळदीमध्ये सामिष भोजनाला बंदी

By admin | Updated: April 26, 2016 03:20 IST

लग्नातील हळदी समारंभ मांसाहार आणि मद्यप्राशनाशिवाय साजरे केले जातील असा महत्वपूर्ण निर्णय रामजन्मोत्सवानिमित्त घेण्यात आला

नागोठणे : पेण तालुक्यातील खारकालई (आमटेम) येथील ग्रामस्थांनी यापुढे होणाऱ्या साखरपुडा तसेच लग्नातील हळदी समारंभ मांसाहार आणि मद्यप्राशनाशिवाय साजरे केले जातील असा महत्वपूर्ण निर्णय रामजन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वर पारायण समारंभाच्या समारोपाप्रसंगी घेण्यात आला असल्याची माहिती भिकाजी नाईक यांनी दिली. आगरी समाजातील बहुतांशी गावांमध्ये लग्न समारंभात जुने रीतीरिवाज सोडून काही अनिष्ट प्रथा वाढू लागल्याने सर्वसामान्य माणसांना आपल्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह करताना फार मोठया आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. साखरपुडा तसेच हळदी समारंभाला ऐंशी ते शंभर किलो मटण आणि हजारो रु पयांचे मद्य आणावे लागत असते. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी नाईलाजाने हा खर्च त्याला करावा लागत असल्याने प्रचंड असा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो. खारकालई गावातील तरु णांनीच पुढाकार घेत रामजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आपल्या घरात यापुढे होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या कार्यक्र मात असे अनिष्ट प्रकार न करणाऱ्या कुटुंबांचा जाहीर सत्कार सुद्धा करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. (वार्ताहर)