शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसमारंभांतून बँडबाजाला फाटा!

By admin | Updated: April 30, 2016 05:11 IST

डीजे, बँडपथकाच्या कर्कश आवाजावर नाचणारी आजची तरुण पिढी आणि त्यामुळे लग्नसोहळ्यास होणारा विलंब हा त्रास नेहमीचाच झाला

ओमप्रकाश देवकर,हिवरा आश्रम (बुलडाणा)- डीजे, बँडपथकाच्या कर्कश आवाजावर नाचणारी आजची तरुण पिढी आणि त्यामुळे लग्नसोहळ्यास होणारा विलंब हा त्रास नेहमीचाच झाला आहे. यावर पर्याय म्हणून हिवरा आश्रम आणि परिसरातील मुस्लीम समाजबंधुंनी लग्नात डीजे किंवा बँडबाजाला फाटा देऊन लग्नसमारंभ शांततेत करण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी २९ एप्रिल रोजी हिवरा आश्रम येथे पार पडलेल्या लग्न सोहळ्यात प्रत्यक्ष दिसून आली.दुष्काळी परिस्थितीत लग्नसोहळा म्हणजे मुलीच्या पित्याच्या मानेवर धोंडाच. त्यामुळे लग्नसोहळ्यात बँडबाजासारख्या गोष्टींवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हिवरा आश्रम व परिसरातील मुस्लीम समाजबांधवांनी डीजे किंवा बँडबाजा पथकाशिवाय लग्नसमारंभ करण्याचा ठराव केला. येथील वार्ड क्र. ४ मधील कासम शहा यांची कन्या सुलतानाचा विवाह लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील चाँद शहा यांच्या नईम नावाच्या मुलासोबत शुक्रवारी शांततेत पार पडला. या अगोदरही याच वार्डातील इसाक व जाकेराबी यांच्या मुलीचा लग्नसोहळा असाच शांततेत पार पडला. दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळणे महत्वाचे आहे. दुसरे कारण म्हणजे, डिजे व बँडपथकामुळे लग्नसोहळा वेळेवर पार पडत नाही, शिवाय ध्वनिप्रदूषण आणि तरुणांचा जल्लोष यामुळे वऱ्हाडी, गावकरी मंडळीला त्रास होतो. या सर्वच गोष्टींचा विचार करून, हा निर्णय घेण्यात आला आहे.