शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘बल्लारपूर’चे रोजंदार कायम

By admin | Updated: March 15, 2016 02:00 IST

मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो

मुंबई: मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांना अखेर नोकरीत कायम केले जाणार आहे.या कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्र लोक कामगार संघटना आणि ‘बिल्ट’ कंपनी यांच्यात १९९७ पासून सुरु असलेल्या तंट्यात गेल्या आठवड्यात उभयपक्षी सहमतीने तडजोड झाली. त्यानुसार असे ठरले की, कंपनीत काम करीत असलेल्या २२४ कामगारांपैकी जे कामगार रोजंदारीवर काम करीत होते त्यांना १ जानेवारी २०१० पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम केले जाईल.यापैकी जे दरम्यानच्या काळात निवृत्त झाले असतील, मृत झाले असतील अथवा ज्यांनी राजीनामा दिला असेल असे ते या तारखेपासून कायम नोकरीत होते, असे मानून त्यांची सर्व देणी दिली जातील, असेही कंपनीने मान्य केले आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या दरम्यान दोन्ही पक्षांना हा तंटा सामोपचाराने मिटविण्याची सूचना केली. त्यानुसार वरीलप्रमाणे समझोता झाला व कंपनीचे अपील निकाली काढले गेले. या खेरीज जे कामगार २४ आॅगस्ट २००९ ते १ जानेवारी २०१० या काळात नोकरी सोडून गेले असतील, त्यांनाही कामावर असलेल्या कामगारांप्रमाणे नसले तरी सुयोग्य पैसे दिले जातील, असेही कंपनीने मान्य केले. (विशेष प्रतिनिधी)पक्षपात दूर झाला, कंपनीने नमते घेतलेरोजंदार कामगारांना कायम करताना कंपनी पक्षपात करते. दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना गेल्या कित्येक वर्षांत कायम केले गेले. पण आमचे सदस्य अनेक वर्षे (काहीजण १९७४पासून) रोजंदारीवर काम करीत असूनही व त्यांनी वर्षात २४० दिवस सलग काम केलेले असूनही त्यांना कायम केले जात नाही, अशी महाराष्ट्र लोक कामगार संघटनेची मुख्य तक्रार होती.अखेर मान्यताप्राप्त नसूनही याच संघटनेने कामगारांना न्याय मिळवून दिला. या कामगारांनी कधी २४० दिवस सलग काम केलेलेच नाही, असे म्हणणाऱ्या कंपनीलाही अखेर त्यांना कायम नोकरीत घ्यावे लागले.