शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सेना उभारणार बाळासाहेबांचे स्मारक

By admin | Updated: August 8, 2014 02:44 IST

शिवसेना-भाजपा महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल.

मुंबई : शिवसेना-भाजपा महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल तसेच मुंबईतील पूर्व किना:याचा विकास करून युवासिटीची उभारणी केली जाईल आदी संकल्प असलेले शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सादर केले. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे; मात्र शिवसेनेने त्याआधीच आपले व्हिजन डॉक्युमेंट दिले. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या काही दिवसांत राज्याच्या दीर्घकालीन विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर करणार आहेत. पण त्याच्याआधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात झालेल्या कार्यक्रमात व्हिजन डॉक्युमेंट दिले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत उद्धव पुढाकार घेत नसल्याची टीका मध्यंतरी झाली होती. तथापि, हे स्मारक उभारणारच असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी) 
 
व्हिजन डॉक्युमेंटची वैशिष्टय़े
च्मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करणार, ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास, नवी मुंबई विमानतळ, रेसकोर्सच्या जागेत भव्य सार्वजनिक उद्यान, नागपूरला वाहतूक हब तर अमरावतीत कृषी हबची उभारणी. 
च्लघू-मध्यम उद्योगांसाठी नवे धोरण, नियमित वीजपुरवठा, राज्यात पर्यटन सर्किटची उभारणी, पूर्णत्वाकडे असलेले सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, सागरी किना:यावर मोठय़ा बंदरांची उभारणी, नवी औद्योगिक नगरे उभारणार. 
च्गरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे, नागपुरात अद्ययावत कर्करोग इस्पितळ, पोलीस दलातील रिक्तपदे वर्षभरात भरणार, प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रसाठीच्या योजनांचा या डॉक्युमेंटमध्ये समावेश आहे. 
 
हायटेक शिवसेना : शिवसेनेच्या पदाधिका:यांशी आणि सामान्यांशी संपर्क साधण्यासाठी राज्यात एकूण 13 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. टप्प्याटप्प्याने राज्यभर ही व्यवस्था पक्षातर्फे उभारली जाणार असून, ठाकरे हे एकावेळी अनेकांशी थेट संपर्क साधणार आहेत.