शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त छळ उद्धवनेच केला - नारायण राणे

By admin | Updated: July 18, 2014 17:41 IST

बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त छळ उद्धव ठाकरेनेच केलाय असं खळबळजनक एकेरी विधान नारायण राणे यांनी केलं असून जुने नेते, जुने शिवसैनिक, नोकर सगळ्यांना हे माहित आहे

ऑनलाइन टीम
कणकवली, दि. १८ - बाळासाहेबांचा सगळ्यात जास्त छळ उद्धव ठाकरेनेच केलाय असं खळबळजनक एकेरी विधान नारायण राणे यांनी केलं असून जुने नेते, जुने शिवसैनिक, नोकर सगळ्यांना हे माहित आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी राणेंवर केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेनं परत माझ्यावर टीका केली तर त्याचं आणखी वस्त्रहरण करू असं सांगत माझ्या नादी लागू नये असं राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वगुण नसून लोकसभेत शिवसेनेचे १७ खासदार केवळ मोदीकृपेमुळे निवडूण आल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरेंना कोकणाच्या कुठल्याही प्रश्नांची जाणीव नसल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरेंच्या मर्दपणावरही त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणवतात. जो खरा मर्द असतो तो दर दोन महिन्यांनी स्वत:ला मर्द म्हणवत नाही असे सांगत, संशय असेल तोच माणूस असा करतो असं ते म्हणाले.
उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा सोमवारी राणे देणार असले तरी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या राजीनाम्याची सगळी कारणं आपण सोमवारीच सांगू असंही ते म्हणाले. हायकंमाडवर आपण कधीही टीका करणार नसलो तरी काँग्रेसमध्ये निष्ठावान नेते,कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय असं राणे म्हणाले. कोकणात दहशत आहे असं जो शिवसेनेकडून कांगावा होतोय तो चुकीचा असून कोकणी माणसाच्या सुख-दुखात उध्दवचं योगदान काय आहे असा प्रश्न राणे यांनी विचारला. माझ्यावर टीका करण्याचा उध्दव ठाकरे यांना नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा माझ्यावर टीका करू नये, नसता त्यांचे वस्त्रहरण मी करेल असे राणे यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांनी जनतेचे प्रश्न आधी समजून घ्यावे नंतर मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहावे असा चिमटाही राणे यांनी काढला. 
भाजपा दिलेला शब्द पाळत नाही हे जनतेला माहित झाले असून देशातला मोदी फॅक्टर आता संपला असल्याचे राणे म्हणाले. सिंधुदुर्गात मुलावर दगडफेक कोणी केली हे पाहण्यासाठीच मी आलो असल्याचे राणे म्हणाले.