शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकाचे जयंतीपूर्वीच!

By admin | Updated: January 3, 2017 05:26 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काळा तलाव परिसरात उभ्या राहत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे

कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काळा तलाव परिसरात उभ्या राहत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये साकारलेला बाळासाहेबांचा पुतळा रविवारीच कल्याणकडे मार्गस्थ झाला आहे. या पुतळयाचे प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या सीमेवर वाजत गाजत स्वागत होत असल्याने सोमवारी सकाळी ९ वाजता कल्याण-शीळ मार्गावर हा पुतळा पोहोचेल अशी माहिती कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. २३ जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे. त्यादिवशी राज्यभर भरपूर कार्यक्रम असल्याने तत्पूर्वीच म्हणजे येत्या रविवारी, ८ जानेवारीला या स्मारकाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ कल्याणमध्ये स्मारक उभारावे, असा ठराव केडीएमसीच्या २०१३ च्या महासभेत संमत करण्यात आला. हा प्रस्ताव तत्कालीन सभागृह नेते रवींद्र पाटील यांनी मांडला होता. प्रस्तावित स्मारकासाठी एक कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आली. स्मारकासंदर्भात केडीएमसीने संकल्पचित्रे मागविली होती. ती चार संस्थांकडून मिळाली. त्यातील शशी प्रभू अ‍ॅन्ड असोसिएटस या संस्थेच्या संकल्पचित्राला पसंती देण्यात आली. काळा तलाव परिसरातील एक एकर भूखंडावर बाळासाहेबांचे स्मारक उभे राहत आहे. प्रत्यक्षात कामाला २०१४ मध्ये प्रारंभ झाला. बाळासाहेबांचा पुतळा कोल्हापुरात शिल्पकार संताजी चौगुले यांनी यांनी साकारला आहे. चार हजार किलो वजनाचा आणि २२ फूट उंच असा हा भव्य पुतळा आहे. काम पूर्ण झाल्याने रविवारी हा पुतळा कोल्हापूर येथून जल्लोषात कल्याणला निघाला आहे. हा पूर्णाकृती पुतळा आणण्यासाठी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक सुधीर बासरे, माजी नगरसेवक सचिन बासरे आदी कल्याणमधील पदाधिकारी शनिवारीच कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी विधीवत पूजा करून हा पुतळा कल्याणला मार्गस्थ झाला. यावेळी स्थानिक आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. पुतळा साकारणाऱ्या संताजी चौगुले यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कल्याणमध्येही पुतळ््याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते चौकाचौकांमध्ये ढोल ताशांच्या गजरात या पुतळयाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. येऊ घातलेली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकांची लागू होणारी आचारसंहिता, निवडणूक प्रचारात गुंतून पडणारे नेते यांचा विचार करून बाळासाहेबांच्या जयंतीपूर्वीच स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला.