शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे, उद्धव यांची ‘काळजी’ घेणार होते एलईटी

By admin | Updated: February 14, 2016 02:08 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजाराम रेगे यांच्याद्वारे मन वळवून अमेरिकेत बोलवण्याचा कट लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) होता, अशी खळबळजनक

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजाराम रेगे यांच्याद्वारे मन वळवून अमेरिकेत बोलवण्याचा कट लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) होता, अशी खळबळजनक साक्ष हेडलीने शनिवारच्या साक्षीदरम्यान विशेष न्यायालयाला दिली. बाळासाहेब ठाकरे व त्यांचा मुलगा अमेरिकेत आल्यानंतर त्यांची ‘काळजी’ अमेरिकेतील डॉ. तहव्वूर राणा आणि एलईटीचे अन्य सदस्य घेणार होते, अशीही माहिती हेडलीने न्यायालयाला दिली. यानंतर सरकारी वकिलांचे हेडलीची साक्ष नोंदवण्याचे काम पूर्ण झाले. आता त्याची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. अमेरिकेतील अज्ञात स्थळावरून डेव्हिड हेडलीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे हजर करण्यात आले. या वेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांनी उद्धव ठाकरे यांचे पब्लिक रिलेशन अधिकारी राजाराम रेगे यांनी १९ मे २००८ रोजी पाठवलेल्या ई-मेलविषयी विचारणा केली. त्या वेळी हेडलीने रेगे यांचा वापर बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येणार होता, असे न्यालालयाला सांगितले.‘रेगे यांनी १९ मे २००८ रोजी मला मेल केला होता. त्यानंतर त्यांनी मला मोबाईलवर एक मॅसेजही केला. या मॅसेजमध्ये त्यांनी मला कॉल करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी त्यांनी पाठवलेला मेल साजिद मीर, डॉ. राणा, पाशा आणि इक्बाल यांना पाठवून त्यांच्याकडून तातडीने सूचना मागवल्या. त्यावर मला वेगवगेळ्या सूचना मिळाल्या. पाशा आणि मीरला शिवसेना भवनावर हल्ला हवा होता. डॉ. राणाला पैसे कमवायचे होते तर मेजर इक्बालला माझी ओळख लपवायची होती. त्याचबरोबर रेगेंकडून भारतीय लष्कराची माहितीही मिळवायची होती,’ असे हेडलीने साक्षीत सांगितले.‘मेजर इक्बालने रेंगेच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एक असा होता की, रेगे भारतीय लष्कराची व निमलष्करी दलाची माहिती देऊ शकतील का? असा होता. मी रेगेंशी संबंध तोडू नयेत. त्यांना सेमिनार आणि कॉन्फरन्समध्ये व्यस्त ठेवण्यास मेजर इक्बालने सांगितले. तसेच रेगे यांना आग्रह करून ‘बाळ आणि मुलगा’ (बाळसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे) यांचे मन वळवून अमेरिकेत आणण्यास मेजर इक्बालने मला सांगितले होते. ते इथे आल्यावर डॉ. राणा आणि एलईटीचे अन्य सदस्य त्यांची ‘काळजी’ घेतील, असेही मेजर इक्बाल यांनी मला सांगितले’ अशीही साक्ष हेडलीने दिली.शनिवारी सरकारी वकिलांनी साक्ष नोंदवण्याचे काम पूर्ण केले. हेडलीला २६/११ हल्ल्याचा हॅन्डलर आणि मुंबईत आलेल्या दहा अतिरेक्यांना हिंदी शिकवणारा व सूचना देणारा अबु जुंदाल याच्या खटल्यात साक्षीदार म्हणून बोलवले आहे. त्यामुळे जुंदालचे वकील आता हेडलीची उलटतपासणी घेतील. जुंदालचे वकील २२ फेब्रुवारी रोजी हेडलीची उलटतपासणी कधी व किती वेळ घेणार आहे, याची तपशिलवार माहिती न्यायालयाला देतील. त्यानंतरच हेडलीची उलटतपासणी घेण्याची तारीख निश्चित करण्यात येईल. (प्रतिनिधी)