शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष : ठाकरी भाषा

By admin | Updated: January 23, 2017 07:59 IST

बाळासाहेब यांची भाषणे म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठी वैचारिक मेजवानीच.रांगडी, थेट हृदयाला भिडणारी भाषा हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य. त्यांच्या 'ठाकरी भाषेतील' काही खास वक्तव्ये..!

बाळासाहेब यांची भाषणे म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठी वैचारिक मेजवानीच... रांगडी, थेट हृदयाला भिडणारी भाषा हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य. समोरच्यावर टीका करताना कोणताही मागेपुढे न पाहता, अक्षरशः शाब्दिक तोफ डागायचे. या तोफगोळ्यांत ज्याच्यावर आरोप व्हायचे ती व्यक्ती अक्षरशः होरपळून जायची. याच भाषेला ठाकरी भाषा असे संबोधन मिळाले.  बाळासाहेब ठाकरेंनी विविध प्रसंगी केलेली 'ठाकरी' भाषेतील काही वक्तव्ये...
 
 
- उद्यापासून देशाला हिंदुराष्ट्र म्हणून संबोधण्यास सुरुवात करा.  हिंदुत्वाचा ज्वलंत विचार घेऊन इस्लामशी टक्कर देण्यास सज्ज व्हा. हे विचार आचरणात आणण्यासाठी वेळप्रसंगी बलिदानास सज्ज व्हा.
 
- काश्मीरच्या निवडणुका झाल्या. आता सीमेवरचे सैन्य काढून घेण्याचा विचार सुरू आहे. हा मूर्ख विचार कोणाचा आहे ', असा सवाल बाळासाहेबांनी केला. ' सीमेवर सैन्य असताना देशात अतिरेकी घुसतात हे कसले लक्षण आहे ? शत्रूराष्ट्राच्या धोक्यापेक्षा देशात घुसलेल्या अतिरेक्यांचा प्रथम बंदोबस्त केला पाहिजे. चार कोटी बांगलादेशी नागरिकांना हाकलून द्या.
 
' गोध्रा , अक्षरधाम , काश्मीरमधील अतिरेक्यांच्या कारवाया पाहिल्या की संताप येतो. अक्षरधाममध्ये तर केवळ दोघांनी घुसून सा-या देशाला वेठीस धरले. तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप असून ती उडाली नाही तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. तुमच्यामध्येसुद्धा अतिरेकी निर्माण झाले पाहिजेत. नुसत्या मुठी आवळून भडकून चिडून ते होत नाही तर त्यासाठी बलिदान करावे लागते.
 
- सीमेवर सैन्य असताना अतिरेकी घुसतात. पंतप्रधानांचा सतत परदेश दौरा चालू असतो. भारतात बहुसंख्य हिंदू असताना हिंदू राष्ट्र जाहीर करण्याची परवानगी कशाला मागता ? उद्यापासून हा देश हिंदुराष्ट्र असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा. आमच्या धर्माचा मान राखलाच पाहिजे. ब्रिटनमध्ये थॅचरबाईंनी मुस्लिमांचे लाड चालू दिले नाहीत , असा पंतप्रधान आपल्याला हवा.
 
- काश्मीर , गोध्रा , सोलापूर येथे हिंदू मारले जात असताना , त्या ठिकाणी भेटायला सोनिया गांधी जात नाही. पण कुठे मुस्लिम दंगलीत अथवा दुर्घटनेत ठार झाले तर या बाई निश्चितपणे तिथे जातात. अमेरिकेतील पाद-याने भाष्य केल्यानंतर कोणत्याही मुस्लिम राष्ट्रात काही घडत नाही , पण सोलापुरात दंगल होते. नंतर पादरी माफी मागतो! 
 
 
- ३६ वर्षांपासून शिवसैनिकांच्या आशीर्वादाने या पदावर आहे. मला धक्का लावून बघा. सारा देश उसळेल. शिवसैनिक व देवदैवत हेच माझे संरक्षण असल्यामुळे मी धमक्यांना भीक घालत नाही. 
 
- रक्त सांडून मिळवलेली मुंबई महाराष्ट्रापासून कोणालाही तोडू देणार नाही.  असा प्रयत्न करणा - यांचे हात तोडून टाकल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. अमेरिकेला भारताला गुलाम बनवायचे आहे.  अणुकरारावरून यूपीए व डावे यांच्यातील वाद चाळीतल्या भांडणाप्रमाणे आहे.   हे एक दिवस एकमेकांना दमबाजी करतात. लगेच दुस-या दिवशी गळ्यात गळे घालतात.
 
- सारा भारत शत्रूंनी घेरलाय. ख्रिश्चनांनी कारवाया वाढवल्यात. श्रीलंकेत तामिळी वाघ थैमान घालत आहेत. नेपाळमध्ये माओवादी ताकदवान झालेत. नक्षलवादी वाढलेत. काश्मीर घुसखोरांनी व्यापलाच आहे. कुठे आहोत आम्ही स्वतंत्र ?'  अशावेळी कशाला तो रामसेतू तोडायला निघालाय ? अमेरिकेची जहाजे जाण्यासाठी मार्ग करायला ? हे एक दिवस देशाच्या मुळावर येणार आहे. 
 
- मी तुमचा तुम्ही माझे , हे नाते माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत कायम राहील. शिवाजी महाराजांनीही अनेकदा अपयश पचवून नवे स्वराज्य उभे केले. शिवसैनिकांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक प्रयत्न करून यशाचे तोरण बांधावे. काँग्रेसच्या नाकतेर्पणामुळे   परदेशी महिलेला अकारण महत्त्व आले. १९९३ च्या दंगलीत शिवसैनिकांनी ताकद दाखवल्यामुळेच त्यानंतर मुंबईत दंगली भडकल्या नाहीत. 
 
 
- स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्या खंडू खोपड्यांसारख्या फितुरांना छत्रपतींनी कधीही माफ केले नाही. त्याचप्रमाणे आज शिवशाहीशी गद्दारी करणाऱ्या फितुरांना खड्यासारखे दूर ठेवा.स्वातंत्र्यानंतरच्या 55 वर्षांपैकी आमची पाच वषेर् वगळता काँग्रेसवाल्यांनीच सत्ता उबवली. या 50 वर्षांत विकासाच्या ऐवजी भकासच देशाच्या वाट्याला आला.सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या तर आपण मंत्रिमंडळात गेलो नसतो , असे पवार आज सांगतात. मुळात तुम्ही तिथे गेलातच कशासाठी , या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला द्या. विदेशीपणाचा मुद्दा घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडलात. आता हा विदेशीपणाचा डाग धुवून काढायला कोणता साबण मिळाला.इटलीहून आलेली ही बाई आपल्याला , तिरंगा हृदयात असायला पाहिजे , हे शिकवते आणि तुम्ही मुर्दाडासारखे ते सहन करता , याची मला आता कीव येऊ लागली आहे.सत्तेवर असताना काँग्रेसकडे चिक्कार पैसा होता त्यावेळी सभेला गदीर् जमविण्यासाठी किती पैसे द्यायचे , याचे हिशेब चालत. आता माझ्यासमोर जी गर्दी आहे , तिच्यातील एकाला जरी सभेला येण्यासाठी पैसे दिले असतील , तर त्याने इथे व्यासपीठावर येऊन सांगावे.
 
 
- मुंबईचा शांघाय करायचा असेल तर करा, पण मुंबई स्वतंत्र करण्याचा प्रयत्न झाल्यास नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत बी फॉर बांगलादेश कदापि होऊ देणार नाही. मुर्दाडांसारखे आम्ही थंड बसणार नाही.
पॅरिसहून कपडे धुऊन आणणारे पं. नेहरू , इंदिरा गांधी , राजीव गांधी आणि सोनिया गांधी हे काय शेतकरी आहेत? यांच्या हाताचे नांगर हे लोकांच्या घरावर चालतात. पवारांचे महाराष्ट्रात स्थान काय तर हुजरेगिरी , मुजरेगिरी...  हे आधुनिक मराठा शरद पवार दोन दोन मिनिटांनी सोनिया गांधी यांच्यापुढे झुकतात. हा मराठा जातीला कलंक आहे.  आता या बाई ' रोड शो ' करणार आहेत. यापूवीर् आम्ही असे प्रकार केले असून त्यामुळे आपण असे रोडावलो आहोत. आता सोनिया गांधी यांनी विदर्भात जाऊन काही आश्वासने दिली आहेत. पण आमचा वचननामा असतो. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो.
अय्यर हे अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या ' मण्यार ' सापासारखे आहेत. सावरकर यांच्याविषयी घृणास्पद उद्गार काढणाऱ्या अय्यर यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू दिले जाणार नाही.