पालघर : पालघरच्या मोर्चाची सज्जता सुरू असताना अचानक एक दुचाकी आली आणि त्यावरील व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कारण, तिच्यावर स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांची झेरॉक्स कॉपी वाटावी, अशी व्यक्ती बसली होती. चेहरा, केसांची ठेवण, दाढीची ठेवण, गॉगल, कपाळावरील आठ्या आणि गंध, अंगकाठी सारे तसेच होते. या गृहस्थाचे नाव कांतिलाल मिश्रा असे असून ते मुंबई-मालाड येथे राहतात. साठीच्या उंबरठ्यावर असलेले कांतिलालजी खास मोर्चासाठी पालघरमध्ये आले होते. ते जिथे जातील, तिथे सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती.
मोर्चासाठी आले ‘बाळासाहेब’
By admin | Updated: October 24, 2016 01:57 IST