शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

By admin | Updated: March 2, 2017 01:56 IST

आगामी वर्षासाठीचे सुमारे १५९ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास सभागृहाने बहुमताने मंगळवारी मंजुरी दिली

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी वर्षासाठीचे सुमारे १५९ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास सभागृहाने बहुमताने मंगळवारी मंजुरी दिली. अर्थसंकल्प एक लाख ९० हजार ९०३ रुपये शिलकीचे आहे.नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष सभेत विविध विकास कामांवरील खर्च, महसुली आणि भांडवली जमा-खर्चाचा तपशील सभागृहासमोर ठेवण्यात आला. त्यावर साधकबाधक चर्चा करत मंजुरी देण्यात आली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सुनील शेळके, मुख्याधिकारी वैभव आवारे उपस्थित होते.सकाळी ११.३० वाजता विशेष सभेस सुरवात झाली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन नगरसेवक गैरहजर होते. नगर परिषदेचे लेखापाल नरेंद्र कणसे यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. सन २०१७-१८ साठी प्रारंभिक शिल्लक ६५ कोटी २१ लाख ७६ हजार ५५७ रूपयांसह १५८ कोटी ५५ लाख ४८ हजार ६२७ रुपये एकूण खर्चाची अंदाजपत्रकीय तरतूद मांडण्यात आली. त्यापैकी एकूण महसुली जमा ४० कोटी ८७ लाख ४३ हजार १०० रुपये आहे. एकूण भांडवली जमा ५२ कोटी ४८ लाख १९ हजार ८७३ रुपये गृहीत धरण्यात आली आहे. त्यातून एकूण महसुली खर्चासाठी ३५ कोटी ६५ लाख ४१ हजार ५०० रुपयांची, तर भांडवली खर्चासाठी १२२ कोटी ९० लाख ७ हजार १२७ रुपयांची तरतूद मांडण्यात आली आहे. अंदाजपत्रक एक लाख ९० हजार ९०३ रुपये शिलकीचे आहे.पुढील वषार्साठी एकूण कर महसूल १३ कोटी १७ लाख २८ हजार ५०० असून गेल्या वर्षाच्या तुलनेत तो केवळ ९००० रुपयांनी जास्त आहे. व्याजापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी ६६ लाखांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाट्यगृहासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. गेल्यावेळी ती एक कोटी एक लाख इतकी होती. आमदार, खासदार निधी केवळ ५० लाख अपेक्षित धरण्यात आला आहे.अंदाजपत्रकाच्या चर्चेत सत्ताधारी पक्षातर्फे पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेविका सुलोचना आवारे, हेमलता खळदे, इंदरमल ओसवाल, अरुण भेगडे, संग्राम काकडे यांनी, तर विरोधकांतर्फे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक अरुण माने, संतोष भेगडे, विशाल दाभाडे, वैशाली दाभाडे यांनी भाग घेतला. चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी उत्तरे दिली. सैंदाणे यांनी आभार प्रदर्शन केले. (वार्ताहर)>तळे विकास : ५० लाख रुपयांची तरतूदआस्थापनेवरील एकूण खर्च तीन कोटी ६७ लाख एवढा आहे. नगराध्यक्षांचे मानधन व वाहन भत्ता यासाठी तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा वीजबिलापोटी नगर परिषदेचे तीन कोटी रुपये खर्च होतील. पोलीस संरक्षण खर्चात तीन लाखांची कपात करण्यात आली आहे. ती केवळ दोन लाख ठेवण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीसाठी ५६ लाख ३५ हजार एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे अंडरग्राऊंड ब्रीजसाठी ११ कोटी तरतूद करण्यात आली आहे. ती वाहतुकीच्या समस्येतून दिलासा देणारी आहे. तळे विकासासाठी नगर परिषदेच्या निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद, तर अशुद्ध पाणी प्रक्रियेवर एक कोटीची तरतूद आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी पाच कोटी, तर सौरउजेर्साठी १२ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.>कर महसूल १३ कोटीप्रारंभिक शिल्लक ६५ कोटी २१ लाख ७६ हजार ५५७ रूपयांसह १५८ कोटी ५५ लाख ४८ हजार ६२७ रुपये खर्चाची तरतूद महसुली जमा ४० कोटी ८७ लाख ४३ हजार १०० रुपये, भांडवली जमा ५२ कोटी ४८ लाख १९ हजार ८७३ रुपये गृहीत.पुढील वषार्साठी कर महसूल १३ कोटी १७ लाख २८ हजार ५०० असून गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ ९००० ने जास्त आहे.