मुंबई : बालहक्क आयोगाने बालगोविंदांबद्दल घेतलेला निर्णय एकतर्फी आहे. त्यामुळे या निर्णयात सरकारने मध्यस्थी करावी, अशी भूमिका घेणा:या समन्वय समितीने या मुद्दय़ावरून उत्सवावरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. मात्र मंगळवारी दहीहंडी समन्वय समितीच्या झालेल्या सभेत बालगोविंदांना चढवणारच, मग करा कारवाई, अशी भूमिका घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रलयात झालेल्या बैठकीत बालहक्क आयोगाने बालगोविंदांना थरांवर चढवण्यास बंदी घालण्याच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर गोविंदा पथकांनी एकत्र येऊन उत्सव खेळूनच निषेध नोंदविण्याचे मंगळवारी जाहीर केले. बालगोविंदांना थरांवर चढवल्याबद्दल पोलिसांकडून कारवाई झाल्यास त्याची पर्वा करणार नाही, अशी भूमिका समितीने घेतली. (प्रतिनिधी)
बालगोविंदांविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटीसाठी वेळ देण्याकरिता विनंती अजर्ही समन्वय समितीने दोन्ही मंत्र्यांना केला आहे. भेटीदरम्यान दहीहंडी या सणाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून दर्जा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येईल. दहीहंडी उत्सवापूर्वीच हा निर्णय घेण्याबद्दलही सांगण्यात येणार आहे. मात्र ही भेट न झाल्यास न्यायप्रक्रियेचाही विचार करण्यात येईल, असे समन्वय समितीने स्पष्ट केले. -आणखी वृत्त/3