शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बजाज कामगारांचे उपोषण

By admin | Updated: October 3, 2016 02:05 IST

चाकण प्लॅण्टमधील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रविवारी विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने आकुर्डी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

पिंपरी : बजाज कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण प्लॅण्टमधील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी रविवारी विश्वकल्याण कामगार संघटनेच्या वतीने आकुर्डी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आकुर्डीतील बजाज कंपनीसमोरील शहीद दत्ता पाडाळे यांच्या पुतळ्यासमोर कामगार उपोषणाला बसले होते. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आॅगस्ट २०१४ ला कामगारांना दहा हजार रुपये पगारवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षांत ३० ते ४० टक्के महागाई वाढली आहे. त्यामुळे मागील पगारवाढीपेक्षात्यामध्ये ४० टक्के वाढ मिळावी. तसेच कामगारांच्या मेडिक्लेमसाठी कंपनी दोनशे रुपये भरत असताना कामगार मात्र ७५० रुपये भरत आहे. तर याच मेडिक्लेमसाठी सुपरवायजर आणि स्टाफचे पैसे कंपनी भरत असून, हा भेदभाव कशासाठी असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. तरी कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी कंपनी घ्यायला हवी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार आणि बाळासाहेब थोरवे यांनी केली आहे.यासह निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेऊ, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यांना कामावर घेण्यात आलेले नाही. हे प्रश्न व्यवस्थापनाने लवकरात लवकर सोडवावेत, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाला विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)