शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॅगचोराला महिलेने शिकवला धडा

By admin | Updated: April 2, 2016 01:38 IST

चालत्या रिक्षातून एका महिलेची पर्स हिसकाविण्याचा प्रयत्न गोरेगावच्या आरे परिसरात घडला. मात्र या महिलेने चोराला न घाबरता उलट त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत चांगलाच

मुंबई : चालत्या रिक्षातून एका महिलेची पर्स हिसकाविण्याचा प्रयत्न गोरेगावच्या आरे परिसरात घडला. मात्र या महिलेने चोराला न घाबरता उलट त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत चांगलाच धडा शिकविला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी या चोरावर दरोड्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. नीरज गोवेकर (२४) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.बीपीओमध्ये काम करणाऱ्या आणि कांदिवलीच्या समतानगर परिसरात राहणाऱ्या डिम्पल मेहता शुक्रवारी पहाटे ४च्या सुमारास घराच्या दिशेने रिक्षातून जात होत्या. त्या वेळी आरेच्या गेट क्रमांक ३ येथे एका दुचाकीवरून आलेल्या गोवेकरने अचानक मेहता यांच्या रिक्षाजवळ जाऊन त्यांच्या हातातील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. जवळपास दोन ते तीन मिनिटे चालत्या रिक्षात हा प्रकार सुरू होता. मेहता यांनी त्यांच्या हातातली पर्स घट्ट धरून ठेवली आणि गोवेकरलाच खेचून दुचाकीवरून खाली पाडले. त्यानंतर रिक्षातून उतरून आरडाओरड केली. त्याचवेळी वनराई पोलिसांचे पथक गस्तीवर होते. मेहता यांचा आवाज ऐकून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहतांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितल्यानंतर गोवेकरला ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)गोवेकरवर दरोड्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडला तेव्हा तो नशेत होता. त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचा तपास सुरू आहे.- चंद्रकांत गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलीस ठाणे