शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेवरील ‘बॅरेजेस’ झाले तुडूंब!

By admin | Updated: July 12, 2016 15:06 IST

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील ११ पैकी ३ ‘बॅरेजेस’ तुडूंब भरली आहेत.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १२ -  सिंचनाचा वाढत चाललेला अनुशेष काही अंशी भरून काढण्यासाठी तब्बल ७१६ कोटी रुपये खर्चून पैनगंगा नदीवरील ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ उभारण्यात आली आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संबंधित सर्वच बॅरेज प्रकल्पात मोठा जलसंचय झाला असून ११ पैकी ३ प्रकल्प तुडूंब भरले आहेत. 
वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खो-याच्या दुभाजकावर येतो. जिल्ह्यात सिंचनाचा प्रचंड मोठा अनुशेष आहे. तो दुर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने १२ फेब्रूवारी २००९ रोजी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ बॅरेजेसची कामे हाती घेतली. त्यापैकी गणेशपूर, जुमडा आणि वरूड बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून इतरही बॅरेजेसच्या पाणीपातळीने ५० टक्क्याचा पल्ला ओलांडला आहे.