शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: January 19, 2016 03:51 IST

उच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिल्यानंतर अखेरीस राज्य सरकारने प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : उच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिल्यानंतर अखेरीस राज्य सरकारने प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही कारवाई करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळांच्या (एमएसआरटीसी) अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने असा शासन निर्णय काढला आहे, अशी माहिती सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. या अवैध वाहतुकीसाठी प्रवाशांना तिकीट विकणाऱ्या एजन्सींवरही कारवाई करावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.राज्य सरकारच्या अनेक विभागांकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने गेल्या वर्षी एमएसआरटीसीने ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, खेळाडू व अन्य जणांना तिकिटामध्ये सवलत न देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी एस.टी. नुकसानीत आहे आणि या नुकसानीस प्रवाशांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस असल्याची माहिती एमएसआरटीसीने खंडपीठास दिली. या अवैध वाहतुकीस चाप लावण्यास आरटीओ अपयशी ठरल्याचेही एमएसआरटीसीने खंडपीठाला सांगितले होते. त्यावर राज्य सरकारने १४ जानेवारी रोजी शासन निर्णय काढत प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग आणि एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. सरकारने वेगवेगळ्या श्रेणीतील नागरिकांना सवलत देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी) > ‘खासगी बसेसचे तिकीट विकणाऱ्यांचे काय? तेही एकप्रकारे अवैध वाहतुकीचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे,’ असे खंडपीठाने म्हटले. त्यावर अ‍ॅड. वग्यानी यांनी एजन्सींवरही योग्य ती कारवाई करू, असे म्हटले. बसस्टॅण्डच्या २०० मीटर परिसरातून खासगी बसेस चालवणाऱ्या बसेसची जिल्हानिहाय आकडेवारी सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला देत या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी ठेवली.