शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर पोलीस निरीक्षक एसएमएसप्रकरणी चौकशीचे आदेश

By admin | Updated: September 8, 2016 05:46 IST

दनापूरचे आमदार आमदार नारायण कुचे यांच्या दबावाला कंटाळून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांना मी कुटुंबीयांसह आत्महत्या करायला

जालना : बदनापूरचे आमदार आमदार नारायण कुचे यांच्या दबावाला कंटाळून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांना मी कुटुंबीयांसह आत्महत्या करायला जात असल्याचा मेसेज २ सप्टेंबर रोजी पाठविल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. या प्रकरणी लोकमतने सविस्तर वृत्त शनिवारच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी दिले. गणेशोत्सवादरम्यान गुलालाची विक्री व्यापाऱ्यांनी करू नये, अशा आशयाच्या नोटिसा पोलीस निरीक्षक काळे यांनी व्यापाऱ्यांना बजावल्या होत्या. व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्यानंतर मी याबाबत विचारण्यासाठी काळे यांना फोन केला व भेटण्यास सांगितले. परंतु ते भेटण्यासाठी आले नाहीत. उलट माझ्या वरिष्ठांना याविषयी बोलण्याचे फोनवर त्यांनी मला सांगितले. त्यानंतर आयजी अजित पाटील, एस.पी ज्योतिप्रिया सिंह आणि अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याशी या नोटिसीविषयी माझे बोलणे झाले. त्याचे गांभीर्य ओळखून माकणीकर हे बदनापूर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसामध्ये दुरूस्ती करून गुलाल विकण्यास मुभा दिली. त्यामुळे काळे यांना मी शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. काही कामानिमित्त ठाण्याच्या पीआयला बोलावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते भेटायला येणे टाळत असतील तर राग येणे सहाजिकच आहे. परंतु मी काळे यांना शिवीगाळ केली नसल्याचे आ. नारायण कुचे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)