शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट ज्वारी गरिबांच्या माथी!

By admin | Updated: February 11, 2017 02:43 IST

वर्षभरापासून पडून असलेल्या ज्वारीचे वाटप.

संतोष येलकर अकोला, दि. १0- शासकीय धान्य गोदामांमध्ये गत वर्षभरापासून पडून असलेल्या ज्वारीला भोंगे लागल्याने, पीठ झालेल्या आणि टोकरलेल्या ज्वारीचे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा विभागामार्फत टोकरलेली ज्वारी जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारल्या जात असल्याची बाब समोर आली आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमी दराने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. वर्षभराचा कालावधी उलटून गेला; मात्र शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश शासनामार्फत पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने, पोत्यांमधील ज्वारीचे दाणे टोकरले असून, हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले आहे. वर्षभरापूर्वी शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश गत १ डिसेंबर रोजी शासनामार्फत देण्यात आला. भारतीय खाद्य निगममार्फत (एफसीआय) जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील ज्वारीची तपासणी करण्यात आल्यानंतर, वर्षभरापासून शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या ज्वारीचे वितरण जिल्हा पुरवठा विभागामार्फत २ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांना करण्यात येत आहे. १ रुपया प्रतिकिलो दराने रास्तभाव दुकानांमधून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना पीठ झालेल्या आणि टोकरलेल्या ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी पीठ झालेल्या आणि टोकरलेली ज्वारी मारली जात आहे.१९ हजार क्विंटल ज्वारी वितरित!राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हय़ातील प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ज्वारी वितरित करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत २ फेब्रुवारीपर्यंत जिल्हय़ातील रास्त भाव दुकानांना १९ हजार ४१0 क्विंटल ज्वारीचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी १५ हजार क्विंटल आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांसाठी ४ हजार ४१0 क्विंटल ज्वारी वितरित करण्यात आली.