शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दूध उत्पादकांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: April 4, 2015 04:27 IST

युरोपियन मिल्क असोसिएशन’ने दूध उत्पादन व प्रक्रियेवरील निर्बंध उठविल्यामुळे त्याचा भारतातील दूध उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची चाहूल

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा‘युरोपियन मिल्क असोसिएशन’ने दूध उत्पादन व प्रक्रियेवरील निर्बंध उठविल्यामुळे त्याचा भारतातील दूध उद्योगावर प्रतिकूल परिणाम होण्याची चाहूल लागताच राज्यातील दूध प्रक्रिया व्यावसायिकांंनी दुधाच्या दरात लीटरमागे एक रुपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर ‘बुरे दिन’ येणार आहेत.दूध व्यवसायातील अग्रेसर स्वीत्झर्लंड, नायजेरिया, डेन्मार्क, आॅस्ट्रेलिया या देशांनी उत्पादन व प्रक्रियेवर निर्बंध ठेवण्यासाठी ‘युरोपियन मिल्क असोसिएशन’ स्थापन केली. मात्र आता या संघटनेने निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा जागतिक दूध प्रक्रिया व्यवसायावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.राज्यात दररोज २ कोटी १० लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ८० लाख लिटर पॅकिंग व मिठाईच्या दुकानांसाठी लागते व सुमारे १ कोटी २० लाख लीटर दुधापासून पावडर तयार करून ती निर्यातही केली जाते. राज्यात २५ दूध पावडर प्रक्रिया प्रकल्प आहेत. ते युरोपच्या निर्णयाने धास्तावले आहेत.गुजरातमधील अमूल डेअरी महाराष्ट्रातून १४ लाख लीटर दूध खरेदी करून सुमारे १८ लाख लीटर दूध महाराष्ट्रात विकत होती. आता अमूल महाराष्ट्राचे अवघे एक लाख लीटर दूध खरेदी करते. दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी गोवा राज्य ७ रूपये, कर्नाटक ४, आंध्रप्रदेश ४, राजस्थान २, हरियाणा २ रुपये प्रति लीटर दुधासाठी अनुदान देते. मात्र राज्य सरकारने दूध व्यवसायाला दिलेला मदतीचा हात केव्हाच काढून घेतला आहे. त्यामुळे हा व्यवसाय आधीच अडचणीत आहे.