शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

पर्वणीकडे पाठ; त्रुटींचा आढावा घेणार

By admin | Updated: September 1, 2015 02:04 IST

वर्ष-दीड वर्षापासून कुंभमेळ्याचे नियोजन करूनही येथील पहिल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीला अपेक्षेहून खूपच कमी भाविकांनी उपस्थिती लावल्याने नियोजनातील त्रुटींचा जिल्हा

नाशिक : वर्ष-दीड वर्षापासून कुंभमेळ्याचे नियोजन करूनही येथील पहिल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीला अपेक्षेहून खूपच कमी भाविकांनी उपस्थिती लावल्याने नियोजनातील त्रुटींचा जिल्हा प्रशासनाने सोमवारी आढावा घेतला. सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविकांनी कुंभमेळ्याकडे पाठ फिरवल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.सोमवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी निवडक अधिकाऱ्यांकडून पहिल्या शाही स्नानाला भाविकांनी अपेक्षित हजेरी न लावल्याचा कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला, तर विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत एक-दोन दिवसांत सर्व यंत्रणांची बैठक होणार आहे. त्यात प्रत्येक अधिकाऱ्याने कारणांची चिकित्सा करून बैठकीत त्याचा ऊहापोह करण्याचे ठरविण्यात आले आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवसाला सर्वाधिक महत्त्व असते. त्या अनुषंगाने प्रशासनाला युद्धपातळीवर तयारी करावी लागते. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठीची अतिदक्षताच पोलीस-प्रशासनाच्या अंगलट येऊन भाविकांनी सारे नियोजन फोल ठरविले. ८० लाख ते १ कोटी इतके भाविक येण्याची शक्यता गृहीत धरलेली असताना प्रत्यक्ष १० लाखांवरच भाविकांनी हजेरी लावली. भाविकांच्या रोडावलेल्या संख्येची कारणमीमांसा करताना पोलीस यंत्रणेवरच सारे खापर फोडले जात असून, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीही खासगीत ते मान्य केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी महसूल खात्याच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी पर्वणीच्या व्यवस्थेचे फेरनियोजन करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला. भाविकांना करावी लागणारी पायपीट, त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मा व्हॅलीचे बसस्थानक, शहरांतर्गत पार्किंगची ठिकाणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली.विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनीही कुंभमेळ्याच्या कामात अधिकाऱ्यांना आलेला अनुभव, नियोजनाबाबतच्या त्रुटी व उपाय, याची चिकित्सा करण्याचे आदेश दिले. एक-दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीत भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)