शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंची अधिकाऱ्यास मारहाण

By admin | Updated: March 30, 2016 00:53 IST

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव बी. आर. गावित यांना मंत्रालयातील त्यांच्या कक्षात मारहाण केल्याने, संतप्त

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव बी. आर. गावित यांना मंत्रालयातील त्यांच्या कक्षात मारहाण केल्याने, संतप्त झालेल्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी अशोक जाधव यांना वांद्रे येथील शासकीय निवासस्थान आणखी वर्षभरासाठी देण्याच्या मागणीसाठी कडू हे जाधव यांना घेऊन गावित यांच्याकडे गेले होते. त्या वेळी कडू-गावित यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. कडू यांनी गावित यांच्या कानशिलात लगावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’ला सांगितले. गावित यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केली आहे. दुपारी दीड वाजता मारहाणीची घटना घडली. कडू यांनी गावितांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केल्याचे अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे आणि समीर भाटकर यांनी सांगितले. बुधवारीही आंदोलन सुरू राहील, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)अजामीनपात्र गुन्हागावित यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी भादंवि ३३२, ३५३ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक पोपट यादव यांनी दिली. हा अजामीनपात्र गुन्हा असल्याने लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी वर्तवली आहे. कडू यांचा मात्र इन्कार : कडू यांनी मात्र मारहाणीचा इन्कार केला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, ‘मी वाद घातला, पण मारले नाही. गावित हे माझ्याशी उद्दामपणे बोलत होते. तुम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशी बोला, असे ते म्हणत होते,’ असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे. - मारहाणीचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही निषेध व्यक्त केला आहे.अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टद्वारे कारवाई करा- मंत्रालयातील उपसचिव गावित यांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली अटक करण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य ओबीसी कास्ट्राइब कर्मचारी महासंघाने मंगळवारी केली आहे. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. - गावित हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने, कडू यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी महासंघाचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी केली आहे.- मारहाण प्रकरणाची मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे चौकशी करतील आणि त्यांनी दिलेल्या अहवालावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितले. अधिकाऱ्याला मारहाण करणे अजिबात योग्य नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सांगितले.- कडू यांनी गावित यांना मारहाण केल्याची बाब मंत्रालयात वाऱ्यासारखी पसरली. नवीन इमारतीच्या मधल्या जागेत काही वेळातच शेकडो कर्मचारी जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. मारहाणीच्या प्रकाराने प्रचंड तणावाखाली असल्याने गावित यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.