शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरास चार वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: July 8, 2015 01:51 IST

नाशिकच्या वेतन पडताळणी पथकातील सहायक अधीक्षक नंदकुमार बैरागी या लाचखोर अधिकाऱ्यास नगरच्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघुले यांनी मंगळवारी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

अहमदनगर : नाशिकच्या वेतन पडताळणी पथकातील सहायक अधीक्षक नंदकुमार बैरागी या लाचखोर अधिकाऱ्यास नगरच्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघुले यांनी मंगळवारी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. लाचखोर अधिकाऱ्यास तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच निकाल आहे.माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांचे वेतन निश्चित करण्यासाठी वेतन पडताळणी समिती नावाने स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. नाशिक येथे मुख्य कार्यालय असून, समितीचे एक पथक नगरमध्ये आहे. याच वेतन पडताळणी पथकाचे (लेखा व कोषागरे) सहायक अधीक्षक नंदकुमार बैरागी याने ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना १४ मार्च २०१३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर येथे त्यास अटक केली होती. दत्तात्रय संभाजी राऊत या तक्रारदारास त्यांच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीच्या त्रुटींची पूर्तता करून वेतननिश्चितीची पडताळणी करण्यासाठी बैरागी याने पैशांची मागणी केली होती. बैरागीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील गोरख मुसळे यांनी काम पाहिले.या खटल्यामध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले. अखेर आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. (प्रतिनिधी)अजामीनपात्र शिक्षानगरच्या न्यायालयात आतापर्यंत लाचखोर अधिकाऱ्यांना तीन किंवा तीनपेक्षा कमी वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. तीन किंवा त्यापेक्षा कमी वर्षांच्या शिक्षेतील आरोपीस जामिनाचे अधिकार जिल्हा न्यायालयाला आहेत. मात्र तीनपेक्षा जास्त वर्षे शिक्षा झाल्यास जामीन देण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला असल्याने आरोपींना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. या प्रक्रियेला विलंब होत असल्याने आरोपींना कोठडीत दिवस काढावे लागतात.