शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील दाम्पत्याने खरेदी केले बाळ

By admin | Updated: April 21, 2016 04:57 IST

मुंबईतील एका जोडप्याने नांदेडाच्या सिडको भागातील सुनीता बालगृहातून दहा दिवसांचे एक बाळ १ लाख ८० हजार रुपयांत विकत घेतल्याचा प्रकार तब्बल दोन वर्षानंतर उघडकीस आला आहे

नांदेड : मुंबईतील एका जोडप्याने नांदेडाच्या सिडको भागातील सुनीता बालगृहातून दहा दिवसांचे एक बाळ १ लाख ८० हजार रुपयांत विकत घेतल्याचा प्रकार तब्बल दोन वर्षानंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बालगृहाच्या संचालिका, मूल खरेदी करणारे जोडपे आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या दोन कुटुंबियांना अटक केली आहे़ बुधवारी पोलिसांनी बालगृहाची झडती घेतली. रेकॉर्डपेक्षा एक बाळ जास्त आढळून आल्याने बालगृहाचे सर्व रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहे.नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या ताडदेव येथील एका दाम्पत्याला विवाहानंतर अनेक वर्षांनंी अपत्य झाले नव्हते़ उपचारानंतरही हे दाम्पत्य अपत्य सुखासाठी आसुसले होते़ बाळासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी होती़ त्यात नांदेडच्या सिडको भागातील सुनीता बालगृहाचा पत्ता त्यांना मिळाला़ त्यानंतर त्यांनी मुंबईहून थेट नांदेड गाठले़ त्यावेळी सुनीता बालगृहाच्या संचालिका सत्यश्री गुट्टे होत्या़ आॅगस्ट २०१४ मध्ये दाम्पत्याने संचालिका गुट्टे यांची भेट घेतली़ तेव्हा त्यांनी बाळ दत्तक घेण्यासाठी बरेच सोपस्कार पूर्ण करावे लागत असून त्यासाठी खूप वेळ जात असल्याचे कारण सांगितले़ त्याऐवजी १ लाख ८० हजार रुपये द्या आणि मूल घेवून जा, असा प्रस्ताव ठेवला़ त्या दाम्पत्यानेही हा प्रस्ताव मान्य केला़ त्यासाठी बहीण आणि मेव्हण्याकडून आर्थिक मदत घेवून दहा दिवसांचे बाळ विकत घेतल़े परंतु या घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबई पोलिसांना आलेल्या एका निनावी पत्रामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला़ मुंबईच्या समाजसेवा शाखेकडून या प्रकरणाची शहानिशा झाल्यानंतर मूल विकत घेणाऱ्या दाम्पत्याला प्रथम अटक करण्यात आली़ त्यानंतर १८ एप्रिल २०१६ रोजी नांदेडातून संचालिका सत्यश्री गुट्टे यांना बेड्या ठोकल्या़ दाम्पत्याला आर्थिक मदत करणाऱ्या कुटुंबियांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)