शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पत्रकारितेचे उपजत गुण असलेले बाबूजी

By admin | Updated: November 25, 2014 00:12 IST

जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांची आज पुण्यतिथी. यवतमाळ येथे राहणा:या एका इतिहासकाराने त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा मागोवा.

जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांची आज पुण्यतिथी. यवतमाळ येथे राहणा:या एका इतिहासकाराने त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा मागोवा.
 
श्री. जवाहरलाल दर्डाना मी 1945-46 सालापासून ओळखतो. यवतमाळ शहरातील काही प्रख्यात व्यक्तींपैकी ते एक होते. डॉ. भा. म. टेंबे, अण्णासाहेब जतकर, डॉ. सिद्धिनाथ काणो आणि वयाच्या संदर्भात ज्येष्ठ, तसेच कार्यकर्तृत्वात विशेष म्हणजे देशाची सेवा समर्पित भावनेने करणारे डॉ. बाबासाहेब परांजपे, गणपतराव माळवी, पृथ्वीगीर हरिगीर गोसावी, दत्ताेपंत काणो, य. खु. देशपांडे, गोपाळराव कोठेकर वकील, कोल्हे वकील, अप्रतिम नेतृत्वाचे गुण असलेले बापूजी अणो इत्यादी इत्यादी मंडळी यवतमाळला ललामभूत ठरली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात वरील मंडळी देशसेवेत हिरीरीने भाग घेत होती. एकजुटीने कार्य करीत होती. पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती. ते नावाकरिता काम करत नव्हते. ही मंडळी दर्डाजींपेक्षा वयाने मोठी होती. जवळ जवळ पिढीचे अंतर. शिवाय 193क् मध्ये त्या सर्वानी जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता. तो सत्याग्रह भारतातला पहिला जंगल सत्याग्रह. त्यात सामील झालेले सत्याग्रही ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने होते. सत्याग्रह यशस्वी झाला. दर्डाजी तेव्हा लहान होते. त्या वेळी यवतमाळचे सामाजिक वातावरण ढवळून निघालेले होते. राजकीय चर्चा गावात सुरूच असत. संवेदनशील मन या सर्व गोष्टी टिपत असते. संस्कार असे अकल्पितपणो घडत असतात. त्यांचे वडील लहानपणीच वारले म्हणून ते जे घडले त्यात सगळ्यात मोठा वाटा त्यांचा स्वत:चा आहे. महात्मा गांधी, विनोबा, वीर वामनराव जोशी, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचे कार्य त्यांना प्रेरणा देणारे ठरले. तशी ही व्यक्तिमत्त्वे त्यांच्या जीवनात बालवयात आली नाहीत. पण, दर्डाजींचे जीवन टीपकागदासारखे होते. आकलन होणो हा दैवदत्त गुण त्यांच्याजवळ होता. मित्रंचा घोळका जमविणो हे वेड त्यांना लहान वयातच लागले होते. त्यांना महात्मा गांधी समजावून सांगणो, त्यांच्या हालचाली वर्णन करणो, यात त्यांचे मन रमू लागले. त्यात ते मित्रंना समरस करून घेऊ लागले.
भय्याजी लहानपणापासून चुळबुळे. त्यांच्या लहान लहान मित्रंना सांगाती घेऊन गणपती बसविला. त्यासाठी त्यांनी बाल गणपती समाज स्थापन केला. त्यांचे मित्र बी. जी. यादव यांच्या म्हणण्याप्रमाणो भय्याजींनी स्थापन केलेली ही पहिली संघटना. गणपतीपुढे आज कोणता देखावा करणार, हे एका पुठ्ठय़ावर ते जाहीर करीत. मग संध्याकाळी तो देखावा तयार होत असे. हे काम लहान ‘जवाहर’चे. या कामात मला त्यांच्या मनात वळवळत असलेल्या विचारांची चाहूल लागते. पुढे तो पुठ्ठा किती तरी दिवस तसाच होता. त्यानंतर त्यांना एक टिनपत्र गवसला. तो त्यांनी वापरला. गांधी चौकात एक विहीर आहे. विहिरीच्या कठडय़ाला टेकून तो पत्र उभा असे. ज्यावेळी काही मजकूर नसे त्या वेळी कधी ‘वन्देमातरम्’ लिहिलेले असे, तर कधी ‘भारत माता की जय’ लिहिले जात असे.
जवाहरलालजी एक पैलूदार हिरा होते. अगदी किशोर वयात म. गांधीजी आणि काँग्रेसच्या बातम्या ते हस्तलिखित स्वरूपात कागदावर, तर कधी त्यांनी मिळवलेल्या फळ्यावर खडूने लिहीत. हे वार्तापत्र म्हणजेच त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात होतीे. त्या वार्तापत्रला ‘सिंहगजर्ना’ हे नावही त्यांनी दिले होते. त्या लहान वयात वर्तमानपत्रच्या संबंधाने त्यांच्या जाणिवा स्पष्ट नसतील, पण पत्रकारिता त्यांच्या मनात डोकावली होती. या सर्व जाणिवा पुढे पुढे परिपुष्ट होत गेलेल्या जाणवतात.
जवाहरलालजींनी कितीतरी खाती मंत्री या नात्याने जीवनात हाताळली.  ऊर्जा, क्रीडा, युवक कार्य (वसंत दादा पाटील) 1978, उद्योगमंत्री (बॅ. अंतुले) 198क्, पाटबंधारेमंत्री (वसंत दादा पाटील) 1984, ऊर्जामंत्री (निलंगेकर) 1985, आरोग्यमंत्री (शरद पवार) 1988, वस्त्रोद्योग, नागरी पुरवठा व अन्न (सुधाकर नाईक) 1991, उद्योगमंत्री (शरद पवार).
एखादं दुसरं महत्त्वाचं खातं सोडलं, तर  भय्याजींकडे सर्व खाती आलेली आहेत. या दरम्यान सहा-सात मुख्यमंत्री सत्तेवर आले. पण, बहुतेक सगळ्यांनी त्यांना मंत्रिपद देऊन गौरविले आहे. याचे प्रमुख कारण भय्याजींची आकलन शक्ती आणि त्या कामाचा तळ गाठण्याची हुकमी सहजता.
दर्डाजी होते कोण? राजकारणी की, मुत्सद्दी देशसेवक की पक्षाचे स्वयंसेवक? कार्यक्षम संघटक की कुशल संघटक? निसर्गावर प्रेम करणारा की शेतीत रस घेणारा? लोकमत हा व्यवसाय समजणारा की लोकमत हे व्रत म्हणून अंगिकारणारा? त्यांनी हाती घेतलेलं कार्य शून्यातून उभं केलेलं आहे. ‘नवे जग’ काढले तेव्हा कधी कधी छापायला शाई नसे. शाई आणायला पैसे नसत. ते इंकाँचे होते. इंकाँच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पण त्यांनी त्यांचे लोकमत स्वतंत्र ठेवले होते. वर्तमानपत्रतील विचार, त्या विचारांचे पावित्र्य त्यांनी सांभाळले होते. त्यांचे नेहमी म्हणणो असे, की बातमी ही जशी घडली तशीच दिली पाहिजे. बातमी राष्ट्रविघातक नको, विधायक असावी. ती विदाऊट फिअर अँड फेअर असावी. दर्डाजींनी पत्रकारितेकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही. ते अस्सल व:हाडी होते. त्यांनी वर्तमानपत्रला व:हाडी दिलदारीने सांभाळले.
लोकमत सुरू असतानाच त्यांनी मराठी डायजेस्ट सुरू केले. त्या काळात मराठी डायजेस्ट अनेक निघत होते. दर्डाजींच्या डायजेस्टचं नाव होते ‘शोभना.’ ते बंद पडले पैशाअभावीच. भय्याजी अतिशय चिकित्सक. पण ते त्याचा अंदाज लागू देत नसत. लोकमतचा मथळा आकर्षकच असायला हवा म्हणून त्यांनी चित्रकार दीनानाथ दलालांकडून दोन चार अक्षरांचे नमुने करून आणले. आज लोकमतचा मथळा हा तेव्हाचा आहे. द्विसाप्ताहिक झाला त्यानंतरचा, ही गोष्ट लहान नाही.
लोकमान्य टिळक यवतमाळला आले होते. त्याच्या दुस:या दिवशी म्हणजे 16.8.19क्5 या तारखेला टिळक अनेक लोकांना भेटले.  सोशल क्लबला भेट दिली. क्लबमध्ये नेमस्त विचारांचे लोक संख्येने जास्त होते. तिथे ते म्हणाले, ‘‘येथे लोक संघटित झाले आहेत. जागे झाले आहेत. त्या लोकांत मला विशिष्ट प्रकारची शिस्त दिसते आहे.’’ त्यांनी हरिकिशोर वर्तमानपत्रच्या कामाचीही प्रशंसा केली आणि ते म्हणाले, ‘‘हे छोटंसं गाव लोकमताचं ठाणं बनणार आहे.’’ त्या दिवशी त्यांनी ‘‘लोकशाही, लोकशिक्षण, लोकअनुशासन, लोककार्यार्थ बाणवलेली जिद्द, यासाठी आवश्यक असलेली स्वयंप्रेरणा - यातून स्वराज्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण अनुकूल होणार आहे. हेच वातावरण लोकमत तयार करू शकणार आहे. म्हणून मला वाटतं की यवतमाळ लवकरच लोकमताचं ठाणं होईल.’’
1917 साली लोकमान्य टिळक यवतमाळला दुस:यांदा आले. त्या वेळी 19क्5 सालचाच विचार विस्ताराने बोलले. त्यांनी म्हटल्याप्रमाणो नंतरच्या काळात खरोखरंच यवतमाळ हे लोकमतचं ठाणं झालं!
 
अरुण हळबे
इतिहासकार