शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या लंडनमधील घरावर शिक्कामोर्तब!

By admin | Updated: August 28, 2015 04:47 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेला लंडनस्थित तीन मजली बंगल्याच्या खरेदी व्यवहारावर महाराष्ट्र सरकारने शिक्कामोर्तब केले.

मुंबई/ लंडन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेला लंडनस्थित तीन मजली बंगल्याच्या खरेदी व्यवहारावर महाराष्ट्र सरकारने शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक वास्तूचे रुपांतर आंतरराष्ट्रीय स्मारकात केले जाणार आहे. ही वास्तू खरेदीची प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे.महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी या वास्तूच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित कराराचे (डीड आॅफ एक्स्चेंज) मालकासोबत अदान-प्रदान केले, असे ब्रिटनमधील फेडरेशन आॅफ आंबेडकराईट अ‍ॅण्ड बुद्धिस्ट आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष संतोष दास (लंडन) यांनी सांगितले. या वास्तूचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्रात रुपांतर केले जाईल, असेही दास यांनी सांगितले.सन १९२१ ते १९२२ दरम्यान डॉ. आंबेडकर लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण (डीएससी) घेत असताना लंडनस्थित १०, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-३ स्थित याच वास्तूत राहत होते. ही वास्तू एका इस्टेट एजंटच्या मार्फत विक्रीस काढण्यात आली होती. हे निवासस्थान खरेदी करण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार दोन दिवसांत रक्कम अदा करील. त्यानंतर ही वास्तू राज्याच्या मालकीची होईल, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विधि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मुंबईत दिली.ही वास्तू खरेदी करण्यासाठी मालकाला अगोदरच ३ कोटी १० लाख रुपये देण्यात आले आहेत. जानेवारीत राज्य सरकारने लंडनस्थित २,०५० चौरस फुट जागेतील हा ऐतिहासिक बंगला ३१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा आणि स्मारकात रुपांतर करून ही वास्तू जतन करण्याचा निर्णय घेतला होता.१० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली महाराष्ट्र सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासंबंधीच्या दस्तावेजांचे अदान-प्रदान केले आहे. १० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली आहे. एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर उर्वरित रक्कमही चुकती केली जाईल. राजकुमार बडोले या ऐतिहासिक क्षणी उपस्थित असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वट केले आहे.जानेवारीत राज्य सरकारने लंडनस्थित २,०५० चौरस फुट जागेतील हा ऐतिहासिक बंगला ३१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा आणि स्मारकात रुपांतर करून ही वास्तू जतन करण्याचा निर्णय घेतला होता.