शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘यूएन’च्या मुख्यालयात बाबासाहेबांची जयंती

By admin | Updated: April 2, 2016 01:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) मुख्यालयात साजरी होणार आहे. कल्पना सरोज फाउंडेशन, फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन आणि परमनंट

मुुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) मुख्यालयात साजरी होणार आहे. कल्पना सरोज फाउंडेशन, फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन आणि परमनंट मिशन आॅफ इंडिया टू युनायटेड नेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या ऐतिहासिक जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. कल्पना सरोज फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना सरोज यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीमुळे प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७० वर्षांच्या इतिहासात त्यांच्या न्यू यॉर्क येथील मुख्यालयात आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी होणार असल्याचे सरोज यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात पहाट असताना अमेरिकन कालगणनेनुसार १३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात देदीप्यमान जयंती सोहळा सुरू असेल.कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांचा भव्य पुतळा संयुक्त राष्ट्रसंघामधील भारताच्या कायमस्वरूपातील सदस्यांकडे सुपुर्द केला जाईल. या वेळी संयुक्त राष्ट्रसंघातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर जगातील वंचित घटकांसाठी अव्याहतपणे काम करणाऱ्या विविध क्षेत्रांतील १२५ व्यक्तींना ‘आंबेडकर रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही सरोज यांनी सांगितले. देशातील सामाजिक न्याय विभागाचे काही अधिकारी आणि काही निवृत्त सनदी अधिकारी या वेळी उपस्थित असतील, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणारन्यू यॉर्कमध्ये कोलंबिया विद्यापीठातून ‘दि इव्होल्युशन आॅफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ या विषयावर बाबासाहेबांनी डॉक्टरेट पदवी मिळवली होती. त्याच न्यू यॉर्कमध्ये भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचा मानसही सरोज यांनी व्यक्त केला.