वाई : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फाईलींवर सही करण्यासाठी हात चालत नव्हता, तर उपमुख्यमंत्र्यांनी मात्र भविष्यातील ठेक्यांना मंजुरी देऊन आपली तिजोरी भरण्याचे काम केले. हे प्रकार राज्याला घातक आहेत, अशी घणाघाती टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.वाई येथे भाजपा, रासप, रिपाइं, शेतकरी संघटना, शिवसंग्राम यांचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सदस्य अविनाश फरांदे, रासपचे जिल्हाध्यक्ष संतोष ढोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप क्षीरसागर, अशोक कदम, वसंत शिंदे, बजरंग खटके, भाऊसाहेब गुंजवटे उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आघाडीतील अनेक मातब्बर नेते तिकिटासाठी दारात उभे होते; परंतु ती पार्सलं परत पाठविली. पुरुषोत्तम जाधव यांचे कार्य बघून त्यांना उमेदवारी दिली. गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकाने अनेक घोटाळे करून राज्याची तिजोरी रिकामी केली असून राज्यावर ३ लाख कोटी रुपयांचे तर प्रत्येक नागरिकावर २७ हजार रुपयांचे कर्ज केले आहे. शेवटच्या एका महिन्यात मुंबईतील बंगल्यात रात्री अर्थपूर्ण सह्यांची मोठी कामे झाल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. काँग्रेसच्या जाहिरातीत महाराष्ट्र नंबर एक आहे, असे दाखविले जाते. पण पंधरा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याच्यार, बेरोजगारी कशी काय वाढली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘प्रस्थापितांनी मतदार संघातील कामात खो घालण्याचे काम केले. त्यामुळे विकास खुंटला.’यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भरत पाटील, विजया भोसले, नगरसेवक अनुप शहा, सचिन धाईवाले, तालुकाध्यक्ष मनोज कदम, नारायण साळुंखे, तुकाराम धायगुडे, आनंदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. काशिनाथ शेलार यांनी प्रास्ताविक केले. राहुल हाडके यांनी सूत्रसंचालन केले. वसंत शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)घराणेशाही मोडीत काढली‘लोकसभेच्या यशानंतर वाई मतदार संघाचे माजी आमदार मदन भोसले भाजपाच्या तिकिटासाठी रांगेत उभे होते. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाही मोडीत काढली,’ असे पुरुषोत्तम जाधव म्हणाले.
‘बाबांची सही’ अन् ‘दादांचा ठेका’ घातक!
By admin | Updated: October 8, 2014 23:02 IST