शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

बाबांच्या हट्टापायी आघाडीचे घोडे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 02:13 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी

- अतुल कुलकर्णी, मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धरल्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे घोडे अडले आहे. बुधवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत, सहापैकी काँग्रेसला दोन जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन जागांचा आग्रह कायम ठेवला असून, त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळविल्याने, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा नाईलाज झाल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही काँग्रेसला आघाडी हवीच आहे. मात्र, राष्ट्रवादी आपल्या पाच जागांवरील दावा सोडायला तयार नाही.सांगली-सातारा (प्रभाकर घार्गे), यवतमाळ (संदीप बाजोरिया), भंडारा-गोंदिया (राजेंद्र जैन), पुणे (अनिल भोसले) या पाच जागी राष्ट्रवादीचे, तर नांदेड येथे काँग्रेसचे अमर राजूरकर विद्यमान आमदार आहेत. जळगावला भाजपाचे गुरुमुख जगवानी आमदार आहेत. सहापैैकी नांदेड आणि यवतमाळची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीने यवतमाळची जागा काँग्रेसला सोडली, तर आ. बाजोरिया स्वत:च्या भावाला उभे करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून अद्याप अंतिम प्रस्ताव आलेला नाही, तो आल्यानंतर कोणाला कोणती उमेदवारी द्यायची ते ठरवू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितले.