शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बाळगंगा प्रकल्प: बाबर यांच्यासह तिघांना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: October 25, 2016 22:12 IST

बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना न्यायालयीन कोठडी

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 25 -  बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना  ठाण्याच्या सत्र न्यायालयाने 8 नोव्हेंबरपर्यत  न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या आरोपपत्रची प्रत दिल्यानंतर पोलिसांना त्यांना  मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ही कोठडी दिली.वर्षभरापूर्वीच याप्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबर यांच्यासह दहा जणांविरुद्ध 3  हजार पानांचे आरोपपत्र 8 ऑगस्ट रोजी ठाण्याच्या विशेष न्यायालयात एसीबीने दाखल केले. आरोपपत्र दाखल होऊनही या प्रकरणात वरील तिघांना अटक झालेली नव्हती. न्यायालयाने त्यांना समन्स बजावल्याने पोलीस निरीक्षक विवेक जोशी यांच्या पथकाने त्यांना मंगळवारी आरोपपत्रसह हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.  महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे बांधल्या जाणा:या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणा-या प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात चौकशीचे आदेश ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष चौकशी पथकाने याप्रकरणाची चौकशी करुन 25 ऑगस्ट 2क्15 रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.  कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीष बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणो पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, रायगड पाटबंधारे विभाग 1 कोलाडचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, कोलाडचे तत्कालीन सहाय्यक अभियंता राजेश रिठे, कोलाडचे तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफए कंन्स्ट्रक्शन आणि एफ.ए. इंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहमद अब्दुल्ला खत्री, निसार खत्री, अबीद फतेह खत्री, झाहीद फतेह खत्री आदी दहा जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला.