शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बाबा बोर्डिंगमध्ये टाकणार म्हणून ‘तो’ घरातून पळाला

By admin | Updated: June 9, 2017 02:03 IST

वडील बोर्डिंगला शिकण्यासाठी पाठवणार असल्याने नाशिक येथून पळून आलेल्या एक १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडील बोर्डिंगला शिकण्यासाठी पाठवणार असल्याने नाशिक येथून पळून आलेल्या एक १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आहे. हा मुलगा बुधवारी नाशिक येथून आलेल्या एका ट्रेनमध्ये दादर आरपीएफ पोलिसांना एकटाच आढळून आला. वडील बोर्डिंगला शिकण्यासाठी पाठवणार असल्याने नाशिक येथील घरातून निघून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार आरपीएफ जवानांनी त्याच्या वडिलांशी संपर्क करून पुन्हा या मुलाला त्याच्या घरी पाठवले आहे.बुधवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात आलेल्या एका ट्रेनमध्ये हा मुलगा दरवाजाजवळ एकटाच बसून होता. दरम्यान, याच ट्रेनने प्रवास करणाऱ्या भूषण पाटील नावाच्या प्रवाशाची या मुलावर नजर गेली. त्याने त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्याने प्रवाशाला काहीही उत्तर दिले नाही. गाडी दादर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर पाटील यांनी ही बाब दादर रेल्वे स्थानकावर असलेल्या आरपीएफ पोलिसांना सांगितली. त्यांनी तत्काळ या मुलाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, त्याने पोलिसांना सर्व घटना सांगितली. घरी अभ्यास करत नसल्याने वडिलांनी आपल्याला बोर्डिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घरी कोणालाही काहीही न सांगताच आपण घरातून पळून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ त्याच्या वडिलांशी संपर्क करून त्यांना दादर रेल्वे स्थानकात बोलावून घेतले आणि या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले.