शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी टाळला बाबा बोडकेचा कार्यक्रम

By admin | Updated: April 3, 2017 01:05 IST

बाबा बोडके व्यासपीठावर असल्याने ऐनवेळी कार्यक्रमात बदल केला़ अर्ध्या रस्त्यातून परत फिरून गणेश कला क्रीडा येथील कार्यक्रमाला जाणे टाळले़

पुणे : काही महिन्यांपूर्वी गुंड बाबा बोडकेसोबतच्या थेट वर्षा बंगल्यावरच्या फोटोमुळे झालेली बदनामी चांगलीच लक्षात असल्याने मुख्यमंत्र्यांनी रविवारी बाबा बोडके व्यासपीठावर असल्याने ऐनवेळी कार्यक्रमात बदल केला़ अर्ध्या रस्त्यातून परत फिरून गणेश कला क्रीडा येथील कार्यक्रमाला जाणे टाळले़ गणेश कला क्रीडा मंच येथे फेडरेशन करंडक ग्रॅव्हिटी मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी दुपारी यशदा येथे कार्यक्रम होता़ त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमानुसार गणेश कला क्रीडा मंच येथे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणार होते़ परंतु, यशदा येथील कार्यक्रमाला येण्यास त्यांना उशीर झाला़ त्यामुळे गणेश कला येथील कार्यक्रमाची सुरुवात झाली होती़ दीपप्रज्वलन कार्यक्रमात बाबा बोडके स्टेजवर आला होता़ हे त्यांना सांगण्यात आल्याचे समजते़ यशदा येथील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा गणेश कला क्रीडा मंचकडे रवाना झाला़ परंतु, हा ताफा स़ प़ महाविद्यालय येथे आल्यानंतर अचानक त्यांचा मार्ग बदलण्यात आला़ ते थेट सर्किट हाऊसला गेले व तेथून रात्री ८़३५ वाजता विमानाने मुंबईला रवाना झाले़ (प्रतिनिधी)>गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मुंबईतील एका बिल्डरसमवेत बाबा बोडके हा वर्षा बंगल्यावर गेला होता़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका झाली होती़ त्या वेळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून बाबा बोडके याची माहिती नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते़ त्यामुळे रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे जाण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळल्याचे बोलले जात आहे़ हा कार्यक्रम स्वीकारताना बाबा बोडके तेथे असणार आहे, याची मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती का अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे़