शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बाराशे कोटींचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 03:46 IST

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे.

मुंबई : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही संबंधितांना अटक होत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला.दरम्यान, यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या प्रश्नावरील चर्चेदरम्यान समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने, तसेच न्यायालयीन आदेशाचा सरकारी निवेदनात उल्लेख करण्यात आला नसल्याने, ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आली.‘गंगाखेड शूगर’चे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी शेतकºयांच्या नावे परस्पर कर्ज लाटल्याचा मुद्दा मुंडे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीेद्वारे उपस्थित केला. गुट्टे यांनी अडीच एकराच्या सातबारावर ५०२ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची गंभीर बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. २०१२ मध्ये मृत पावलेल्या २२५ शेतकºयांच्या नावे परस्पर कर्ज काढले आहे, तसेच हे कर्ज संबंधित शेतकºयांच्या खात्यांऐवजी गंगाखेड शुगरच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यात बँकांचे अधिकारीही सहभागी आहेत. मागील दहा महिन्यांपासून आपण स्वत: या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे अन्वेषण आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, सरकारकडून आपल्या पत्रांची कोणतीही दखल घेण्यात आली, उलट गुट्टे यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला, परंतु २२ दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलेले निवेदन सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. परभणी, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती आहे.