शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

आजम खानची जीभ हासडण्याची हिंमत भाजपमध्ये आहे ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 21, 2016 07:52 IST

सामनाच्या अग्रलेखात समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आजम खान यांना लक्ष्य करताना भाजपावर निशाणा साधला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आजम खान यांना लक्ष्य करताना भाजपावर निशाणा साधला आहे. ‘मला चहा बनवता येतो, चांगले कपडे घालता येतात आणि ड्रमही वाजवता येतो. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो,’’ असे तोंडाचे डबडे वाजवून आजम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. 
 
एरवी मुंबईतील काही टिनपाट लोक ऊठसूट शिवसेनेवर टीका करीत आहेत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून शब्दांचे तोबरे सोडायला अक्कल लागत नाही, पण या टिनपाट लोकांनी आजम खान यांच्यासारख्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी. 
 
आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदींची खिल्ली उडवणा-या आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्‍यांत आहे काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदी यांनी चहा विकता विकता देशभक्ती केली. आजम खान यांनी उलटे केले. या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सर न्यायाधीश अनेकदा मुसलमान झाले व त्यांनी उत्तम काम केले. आजम खान यांनी हे सर्व लक्षात घेतलेले दिसत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असे जरी असले तरी आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्‍यांत आहे काय? 
 
- मुंबईतील काही टिनपाट लोक ऊठसूट शिवसेनेवर टीका करीत आहेत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून शब्दांचे तोबरे सोडायला अक्कल लागत नाही, पण या टिनपाट लोकांनी आजम खान यांच्यासारख्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी. आजम खान यांनी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष केले आहे. ‘‘मला चहा बनवता येतो, चांगले कपडे घालता येतात आणि ड्रमही वाजवता येतो. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो,’’ असे तोंडाचे डबडे वाजवून आजम खान यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे. देशाच्या पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे योग्य नाही, पण आजम खान यांच्यासारख्यांच्या डोक्यावर फरकॅप असली तरी टोपीखालच्या कवटीत मेंदू नाही 
 
- पंतप्रधान होण्यासाठीची योग्यता काय याचा पाढा आजम खान यांनी वाचला. पण देशभक्ती हा सर्वात मोठा गुण रक्तात भिनावा लागतो, जो मोदींच्या रक्तात आहे. आजम मियाँच्या रक्तात तो आहे काय ते सांगता येणार नाही. मुसलमानांचे नेतृत्व करायला हरकत नाही. कारण राजकारणात हीच त्यांची रोजीरोटी आहे, पण ऊठसूट मुसलमानांची माथी भडकवून आगी लावायच्या व त्यावर राजकीय ‘कबाब’ भाजून घ्यायचा हा अतिरेक आहे. आजम खान त्या प्रकारचे अतिरेकी आहेत. आजम खान कधी पाकिस्तानचे गोडवे गातात तर कधी हिंदुस्थानातील मुसलमान असुरक्षित असल्याची बांग ठोकत ‘युनो’ला साकडे घालतात. हा सरळ सरळ देशद्रोहच आहे.  
 
- पंतप्रधान मोदी हे चहावाले जरूर असतील, पण आजम खानप्रमाणे बिनडोक आणि धर्मांध नक्कीच नाहीत. एक चहा विकणारा सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान होतो हा आपल्या लोकशाहीचा व सामान्य जनतेचा विजय आहे. पंतप्रधानांनी चांगले कपडे घालणे हा गुन्हा नाही. शिवाय देश तसा वेश या न्यायाने एखाद्या समुदायात सहभागी होत पंतप्रधानांनी त्यांच्या परंपरागत नाचगाण्यात सामील होणे किंवा वाद्य वाजवणे हादेखील टीकेचा विषय होऊ शकत नाही. पंडित नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी यांनी हे सर्व वेळोवेळी केले आहे. त्यामुळे आजम खान यांचा निशाणा साफ चुकला आहे. पंतप्रधान झालो तर प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात २५-२५ लाख जमा करीन, अशी कोपरखळी आजम खान यांनी मारली. ती भाजप पुढार्‍यांना झोंबणारी आहे. कारण सत्तेवर येताच सर्व काळाबाजारवाल्यांना धडा शिकवू, परदेशी बँकांतील लाखो कोटींचे काळे धन परत आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख जमा करू, असे वचन मोदी यांनी दिले होते व आजम खानसारखे बेरकी त्यावरच प्रश्‍न विचारीत आहेत. 
 
- या प्रश्‍नाचे उत्तर शिवसेनेवर आंधळेपणाने टीका करणार्‍यांकडे नसावे. तसे ते असते तर छातीवरची बटणे तुटेपर्यंत दीर्घ श्‍वास घेऊन त्यांनी आजम खानला दम भरला असता, पण आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदी यांनी चहा विकता विकता देशभक्ती केली. आजम खान यांनी उलटे केले. त्यामुळे ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील खलनायक ठरत आहेत. आपण मुस्लिम आहोत हा एकच माझा कमकुवतपणा आहे असे त्यांनी सांगणे हा देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान आहे. या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश अनेकदा मुसलमान झाले व त्यांनी उत्तम काम केले. आजम खान यांनी हे सर्व लक्षात घेतलेले दिसत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असे जरी असले तरी आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्‍यांत आहे काय?