शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणा-या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 7, 2015 09:04 IST

दादरी कांडानंतर भारतातील मुस्लिमांच्या दुर्दशेकडे 'युनो'ने लक्ष घालण्याची मागणी करत घरातले भांडण चव्हाट्यावर नेत हिंदुस्थानचे वाभाडे काढणा-या आझम खानची हकालपट्टी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - दादरी हत्याप्रकरणानंतर हिंदुस्थानातील मुसलमानांच्या दुर्दशेकडे 'युनो'ने ( संयुक्त राष्ट्र संघ) लक्ष घालावे अशी मागणी करत देशाची इज्जत आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर नेणारे आझम खान हे एकप्रकारे देशद्रोही असून मुलायम सिंग यादव यांच्या धमन्यांत कणभर जरी राष्ट्रभक्ती असेल तर त्यांनी आझम खानची हकालपट्टी केली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आझम खानवर टीका केली आहे. 'सामना' या शिवेसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून त्यांनी आझम खान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 
आझम खानला देशातील कुठल्याही घटानात्मक पदावर राहण्याचा अधिकार नसून निवडणूक आयोगाने त्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे अशी मागणीही उद्धव यांनी केली आहे. दादरी येथे एका माणसाच्या मृत्यूनंतर सर्व  बेगडी निधर्मी पक्ष व पुढारी नक्राश्रू ढाळत आहेत, मात्र मक्केतील चेंगराचेंगरीत हजारांवर मुस्लिम चिरडून मेले, त्यात शंभरेक भारतीयांचा समावेश आहे, पण त्या घटनेबाबत एकाही राजकीय पुढा-याने साधा उसासाही सोडला नाही. कारण त्यांच्या मरणाचा 'व्होट बँकेशी' संबंध नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.
दादरी प्रकरणावरून भाजपावर होणा-या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ' या सर्व प्रकरणात भाजपाला हिंदुत्ववादी म्हणून झोडपणे सर्वार्थाने चूक आहे. सत्तेत असलेला भाजप शत-प्रतिशत निधर्मी म्हणूनच कारभार करीत आहे. मुसलमानांनी अर्ध्या रात्री दरवाजा ठोठवावा, आपण त्यांच्या मदतीस धावून जाऊ, असे वचन पंतप्रधान मोदी यांनीच दिले आहे. त्यामुळे अशा ‘निधर्मी’ राजवटीत मुसलमानांवर अत्याचार होतात म्हणून थेट ‘युनो’कडे धाव घेणे हा देशाचा व पंतप्रधान मोदींचा अपमान आहे' असे त्यांनी लेखात म्हटले आहे.
या लेखात उद्धव यांनी उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली आहे.  जिथे ही घटना घडली ती दादरी ही उत्तर प्रदेशात येते, त्यामुळे उत्तर प्रदेशचे सरकार निकामी व षंढ आहे असे म्हणावे लागेल. असे कुचकामी सरकार असल्यामुळे उत्तर प्रदेशची कायदा-सुव्यवस्था ढासळून तेथे अराजक निर्माण झाले आहे आणि त्यातूनच दादरीसारख्या घटना घडवून दोन धर्मांत तणाव निर्माण होत आहे. दादरी प्रकरण इतके झोंबले असेल तर आझम खान यांनी प्रथम मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता व मुख्यमंत्री अखिलेश यादवांचा राजीनामा मागायला हवा,अशी मागणी उद्धव यांनी केली आहे.