शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘आझाद हिंद’मध्ये चोरट्यांची लूटमार

By admin | Updated: March 2, 2016 01:14 IST

दौंड रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या आझाद हिंद एक्स्प्रेसवर मंगळवारी पहाटे चोरट्यांनी दगडफेक करीत प्रवास करणाऱ्या माय-लेकींवर शस्त्राने हल्ला केल्या.

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या आझाद हिंद एक्स्प्रेसवर मंगळवारी पहाटे चोरट्यांनी दगडफेक करीत प्रवास करणाऱ्या माय-लेकींवर शस्त्राने हल्ला केल्या. यात त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्याकडील पर्स व पैसेही चोरले. या प्रकाराने रेल्वे प्रवासी धास्तावले होते. एस ५ या बोगीतून या दोघी प्रवास करीत होत्या. संपा सिन्हा (वय ५४), सामिया सिन्हा (वय २५, दोघीही रा. मालवीयनगर, चिरीमिरी, जि. कोरिया, छत्तीसगड) अशी जखमी महिलांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या माय-लेकींवर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आझाद हिंद एक्स्प्रेस दौंड स्थानकात येण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सिग्नलवर थांबविण्यात आली होती. या बोगीत एका बाजूला असलेल्या दोन खिडक्यांजवळ माय-लेकी झोपलेल्या होत्या. खिडक्यांच्या काचा उघड्या होत्या.या खिडकीतून अज्ञात व्यक्ती पर्स ओढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रतिकार करीत पर्स हाताने दाबून धरली. चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने माय-लेकींच्या हातांवर वार केले आणि पर्स घेऊन पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी रेल्वेवर तुफानी दगडफेक केली. या परिसरात रेल्वे बराच वेळ थांबून होती. मात्र पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी वेळेवर आले नाहीत. जखमी झालेल्या या दोन्ही माय-लेकी मदतीची याचना करीत होत्या. काही वेळाने गाडी रेल्वे स्थानकात आली, तेव्हा प्रवास करणारे प्रतीक साळुंके, आनंद ओव्हाळ, विश्वजित पाचपुते या तिघांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी पुढील प्रवास रद्द करून या माय-लेकींना रेल्वेस्थानकात उतरविले. त्यानंतर रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन घटनास्थळी आले.रेल्वेचे डॉ. संजीव यांनी रेल्वे स्थानकात प्राथमिक उपचार केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या दोघी महिलांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम पवरे आणि पोलिसांनी घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. श्वानपथकाने दाखविलेल्या दिशेनुसार घटनास्थळापासून काही अंतरावर पर्समधील एटीएम कार्ड मिळाले. पुढे काही अंतरावर पर्स मिळाली. पर्समध्ये मोबाईल, महत्त्वाची कार्डे आणि ३५० रुपये होते. (वार्ताहर)1 हातावर वार झाल्यानंतर संपा सिन्हा या बेशुद्ध पडल्या. त्यांची मुलगी सामिया मदतीची याचना करीत होती. गाडी रेल्वेस्थानकात आली. तेव्हा प्रतीक साळुंके, आनंद ओव्हाळ आणि विश्वजित पाचपुते यांनी या दोन्ही महिलांना रेल्वेगाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरविले. मदतीला धावून आलेले युवक दुपारपर्यंत या माय-लेकींसोबत दवाखान्यात होते. तसेच प्रतीक साळुंके या विद्यार्थ्याची बी. एस्सी. भाग एकचा पुण्याला पेपर होता. मात्र पेपर बुडवून त्याने सामाजिक बांधिलकी जोपासली.सामिया सिन्हा हिचा कोथरुड येथील इंटरनॅशनल फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूटमधून फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण झाला आहे. भाडेतत्त्वावर घेतलेले घर सोडून सामान घेऊन या माय-लेकी पुन्हा छत्तीसगड येथे जाणार होत्या. मात्र त्यांच्या जिवावर ही दुर्दैवी घटना बेतली. या वेळी सामिया म्हणाली, ‘‘बोगीतील एकही प्रवासी मदतीला आला नाही. काही चोरटे आमच्या हातावर वार करीत होते. काही जण रेल्वे बोगीवर दगडफेक करीत होते.’’